डायबेटीस हा अनुवांशिक असू शकतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:58 IST2016-01-16T01:19:04+5:302016-02-06T09:58:37+5:30
व्यायाम तसा संगळ्यांसाठीच चांगला आहे.

डायबेटीस हा अनुवांशिक असू शकतो?
व यायाम तसा संगळ्यांसाठीच चांगला आहे. पण, ज्यांच्या मातापितांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये टाईप-2 प्रकारचा डायबेटिस आढळून आला आहे. त्यांना जास्त व्यायामाची गरज आहे. कारण त्यामुळे तो टाळता येवू शकेल असे एका अभ्यासातून समोर आलेले आहे. टाईप-2 प्रकारच्या डायबेटीसचा संबंध अनुवांशिक आणि जीवनशैलीशी येवू शकतो. तुमच्या नात्यात जर कोणाला त्याप्रकारचा डायबेटीस असेल तर तो तुम्हाला होण्याची जोखीम तीपट्टीने वाढते. तो टाळण्यासाठी पोषक आहार आणि जास्त व्यायाम गरजेचा ठरत असतो. या अभ्यासासाठी स्विडन येथील एका विद्यापीठाच्या अभ्यासकांनी व्यायामाचा अशा लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषन केले आहे. या अभ्यासासाठी 50 कमजोर, गरजेपेक्षा जास्त वजन असलेले पण सशक्त लोक निवडले गेले होते. जे त्यांच्या चाळीशीत होते. सात महिन्याच्या या अभ्यासात त्यांना फिटनेस सेंटरमध्ये नियमित व्यायाम देण्यात आला होता.