/>हार्ले डेविडसन बाईकवर स्वार होऊन संसद भवनात पोहोचलेल्या खासदार रंजीता रंजन यांनी आज सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. महिना दिनाच्या मुहूर्तावर रंजीता रंजन यांची संसदेतील एन्टी एकदम हटके ठरली. बिहारच्या सुपौल येथील काँग्रेसच्या ४२ वर्षीय लोकसभा खासदार रंजीता निळ्या रंगाचा पोशाख, डोक्यावर हेल्मेट आणि डोळ्यांना उन्हाचा गॉगल अशा थाटात नारंगी रंगाच्या हार्ले डेविडसन बाईकवर स्वार होऊन संसद भवनात पोहोचल्या. यानंतर त्यांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला. दोन मुलांची आई असलेल्या रंजीतांचे बाईक प्रेम यानिमित्ताने समोर आले. मी माझ्या नवºयाला सुद्धा या बाईकला हात लावू देत नाही. स्वत:च्या कमाईने मी ती खरेदी केली आहे. मी चालवते आणि माझा नवरा मागे बसतो, असे रंजीता यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. हार्ले डेविडसन या बाईकची किंमत साडे चार लाखांपासून सुरू होते.
![]()