ब्रँडेड कपड्यांनी वाढतो आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 09:25 IST2016-02-24T16:20:07+5:302016-02-24T09:25:26+5:30

संशोधकांनी केलेल्या एका अध्ययनातून असे दिसून आले की, महागडे, ब्रँडेड कपडे घातल्यानंतर आपला आत्मविश्वास दुणावतो.

Branded clothing enhances self confidence | ब्रँडेड कपड्यांनी वाढतो आत्मविश्वास

ब्रँडेड कपड्यांनी वाढतो आत्मविश्वास

म्हाला कधी असा अनुभव आला की जेव्हा तुम्ही एखादा महागडा शर्ट किंवा ब्रँडेड पँट, नाईके, आदिदासचे शूज घातल्यावर आपोआपच भारी वाटते, आत्मविश्वास वाढतो? नक्कीच वाटत असणार. कारण याला आता वैज्ञानिक पुष्टीदेखील मिळाली आहे. 

‘नॉट्रे डेम युनिव्हर्सिटी आॅफ केन्टकी अँड पेन स्टेट’ येथील संशोधकांनी केलेल्या एका अध्ययनातून असे दिसून आले की, महागडे, ब्रँडेड कपडे घातल्यानंतर आपला आत्मविश्वास दुणावतो आणि आपली कामगीरीसुद्धा सुधारते.

sute

परंतु ही सगळी आपली कल्पना आहे. मनाचे खेळ. महागडे कपडे केवळ आपल्याला मानसिक बुस्ट देतात. ब्रँडच्या नावाचा आपल्या आणि समोरच्यावर सकारात्मक परिणाम होत असतो.

ब्रँडमुळे लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. संशोधकांनी केलेल्या प्रयोगात जेव्हा धावपटूने अतिमहागडे शूज घातले तेव्हा तो अधिक वेगाने धावला. यामध्ये बुटांचा काही परिणाम नव्हता. धावपटूचा केवळ विश्वास वाढला.

suits

काही ब्रँड्सनी आपली ओळख अशी निर्माण केली आहे की, लोक त्यांच्याशी स्वत:ला जोडू पाहतात. ते कपडे किंवा वस्तू वापरल्या तर आपण त्या एक्सक्लुझिव्ह ग्रुपचे सदस्य होतो अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे ब्रँडेड कपडे, शूज, अ‍ॅक्सेसरीज तुमच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला परिणाम करू शकतात.

Web Title: Branded clothing enhances self confidence