‘प्रिंटेड ब्लेझर’चा बोल्ड आणि बेधडक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 23:09 IST2016-06-14T17:37:28+5:302016-06-14T23:09:01+5:30
प्रिंटेड ब्लेझर्सचा ‘बाज’च निराळा. या लेखात आपण अशाच ब्लेझर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

‘प्रिंटेड ब्लेझर’चा बोल्ड आणि बेधडक अंदाज
‘ ॅशन’ म्हणजे नेमके काय? याचे सरळसरळ उत्तर मिळेल की, स्टायलिश कपडे म्हणजे फॅशन. हीरो-हीरोईन घालतात ती फॅशन. रॅम्पवर कॅटवॉक करणाऱ्या मॉडेल्सचा पेहराव म्हणजे फॅशन.
पण ही व्याख्या बरोबर नाही. फॅशनचा अर्थ सेलिब्रेटींनी कोणते कपडे घातले असा नसतो.
आपले व्यक्तीमत्त्व, सामाजिक व वैयक्तिक विचारधारा आणि संस्कृतीचे ‘लेटेस्ट एक्सप्रेशन’ म्हणजे फॅशन होय. अभिव्यक्तीचा तो एक भाग आहे.
आजची तरुण पीढी मुक्त व प्रगतीशील विचार करणारी, सैरभैर बागडणारी, जोखीम पत्कारणारी आणि परिणामांना न घाबरणारी आहे. अशा ‘डायनॅमिक जनरेशन’ला शोभून दिसणारी बोल्ड आणि बेधडक फॅशन म्हणजे पॅटर्न/प्रिंटेड मेन्सवेअर्स.
त्यातल्या त्यात प्रिंटेड ब्लेझर्सचा ‘बाज’च निराळा. या लेखात आपण अशाच ब्लेझर्सबद्दल जाणून घेणार आहोत.
‘टाईमलेस’ वाड्रोबमध्ये प्रिंटेड ब्लेझरची जागा अढळ आहे. विविध ढंगाने परिधान करू शकणारे हे ब्लेझर्स तुमच्या व्यक्तीमत्त्वाची ‘बोल्ड साईड’ दर्शवतात, जी पाहून सर्वाच्या नजरा तुमच्या जरूर खिळणार यात काही शंका नाही. स्वत: एक स्टाईल स्टेटमेंट किंवा इतर आऊटफिटचा रुबाब उंचावणारे म्हणूनही अशा ब्लेझर्सचा वापर केला जाऊ शकते.
भंपकपणा कि स्टाईल स्टेटमेंट?
प्रिंटेड ब्लेझर म्हणजे पारंपरिक ब्लेझरचे ‘अनकन्व्हेंशनल’ रुप आहे. जुन्याला मसालेदार तडका दिल्यासारखे आहे ते. स्वत:ला काहीसे भडक परंतु बेधडक पद्धतीने प्रेझेंट करण्यासाठी प्रिंटेड ब्लेझर सर्वोत्तम पर्याय आहे. रंगसंगती, नानाविध डिझाईन्स तरुणांच्या ‘केअर फ्री स्पीरीट’चे प्रतीक आहे.
तरुणपणी असे कपडे नाही घालायचे तर कधी? परंतु असा पोषाख सर्वांनाच जमेल असे नाही. योग्य ती काळजी नाही घेतली तर चारचौंघात हसू होण्याचीही शक्यता असते. भंपकपणा वाटू न देता स्वत:ची स्टाईल स्टेटमेंट निर्माण करण्यासाठी पुढील तीन पर्यायांचा विचार करायलाच हवा.
प्रिंटेड ब्लेझर ‘कॅरी’ करण्याच्या तीन पद्धती :
1. न्यूट्रल इफेक्ट -
प्रिंट ब्लेझर अल्टिमेट फॅशन स्टेटमेंट आहे. परंतु पारंपरिक ब्लेझरच्या अतिजास्त विरुद्ध किंवा अगदीच विचित्र पद्धतीच्या डिझाईन्स किंवा रंग निवडणे शक्यतो टाळावे. आपण सर्वजण काही रणवीर सिंग नाही की कसलेही जॅकेट घातले तर चालून जाईल. त्यामुळे अतिरंजकपणा टाळून आपल्या पर्सनालिटीला शोभेल असेच पॅटर्न निवडा.
2. कॉन्ट्रास्ट कलर्स -
बोल्ड पॅटर्न प्रिंटला कॉप्लिमेंट म्हणून न्यूट्रल ब्लॉक रंग, जसे की - पांढरा, क्रीम- वापरावे. संपूर्ण ड्रेसमध्ये सर्वात महत्त्वाचे ‘ब्लेझर’ आहे. जास्त फोकस त्यावरच राहिला पाहिजे. त्यामुळे ब्लेझरला क्लॅश करणारे रंग वापरणे टाळावे. स्लिम/स्किनी डार्क वॉश डेनिम तर बेस्ट आॅप्शन आहे.
![Printed blazer]()
3. आत्मविश्वास -
प्रिंटेड ब्लेझर छान कॅरी करण्यासाठी डिझाईन, रंग, पॅटर्न बरोबरच घालणाऱ्याचा आत्मविश्वासही खूप महत्त्वचा आहे. जर तुमच्यामध्ये तो ‘कॉन्फिडन्स’ नसेल तर असे ब्लेझर तुमची संपूर्ण शान धुळीस मिळवू शकते. जर दोन ब्लेझर्समध्ये कन्फ्युजन असेल तर बिंधास्तपणे कोणताही एक घाला; पण आत्मविश्वास बाळगा.
4. मिक्स मॅच पॅटर्न -
प्रिंटेड ब्लेझर निवडताना त्यावरील पॅटर्न तुम्ही मिक्स मॅच करू शकले तर सर्वोत्तम लूक मिळेल. त्यासाठी मॅचिंग करावयाचा पॅटर्न/प्रिंट्स एकाच रंगाचे किंवा टोनचे असले पाहिजे. तसेच पॅटर्नला तेच पॅटर्न मॅच करा. उदाहरणर्थ, चेक्सला चेक्स पॅटर्नच असावे परंतु त्याची साईज वेगळी हवी. अन्यथा एकाच आकाराच्या चौकटी घातलेला लूक तुम्ही कल्पना नाही करू शकत एवढा वाईट दिसतो.
प्रिंटेड ब्लेझर : तीन डिफरंट लूक्स
केवळ एखाद्या समारंभासाठी तुम्ही प्रिंटेड ब्लेझर वापरावे असा काही नियम नाही. पुढील तीन स्टाईल टिप्स वापरून तुम्ही दैनंदिन कार्यवेळेतही ते वापरू शकता.
लूक 1 : स्टेटमेंट स्टाईल
फ्लोरल सुट तर स्ट्रीट स्टाईलचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. त्यावर स्टेपल पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि नेव्ही निटेड टाय तर तुमचा रुबाब शतपटीने वाढवेल. केवळ शर्ट आणि टाय आणि ग्रे रंगाचे स्वेड डबल मॉक शूज यांच्या परफेक्ट कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला किलर लूक मिळतो. ग्रे पॉकेट स्वेअर अशा प्रकारच्या शूजवर फार छान दिसतो आणि न्यूट्रल रंग सूटचा भडकपणा जास्त उठून दिसत नाही.
लूक २ : पॅटर्न मिक्सिंग
प्रिंटेड ब्लेझर तुमच्या ड्रेसिंगमधील मुख्य भाग जरी असला म्हणून शर्टकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विरळ डिझाईन असलेल्या प्रिंटेड जॅकेटवर गिंघॅग चेक शर्ट खूप उठून दिसतो. जॅकेट आणि शर्टचे पॅटर्न एकमेकांना एकदम पूरक लूक देत असल्यामुळे दोन्ही फार छान ब्लेंड होऊन जातात. त्याबरोरबच ग्रे रंगाची चिनोज् किंवा ट्राऊझर पँट घालावी. थोडसा वेगळा लूक हवा असले तर जीन्स आणि डेझर्ट बूटदेखील उत्तम पर्याय आहे.
लूक ३ : स्मार्ट कॅज्युअल
चेक ब्लेझर ही फार दीर्घकाळ ट्रेंडमध्ये राहणार यात काही शंका नाही. चेक ब्लेझर आणि न्युट्रल ट्राऊझर्स सिंपल शर्ट आणि टाय हे सॉलिड कॉम्बीनेशन आह. त्यावर जर लोफर्स चढवले तर क्या बात है! मस्त फ्रायडे स्मार्ट कॅज्युअल लूक मिळतो.
![ranveer printed]()
बॉलिवूडलाही सेलिब्रेटींनी क्रेझ...
cnxoldfiles/span> कार्यालयाला भेट दिली होती तेव्हा त्याने परिधान केलेले प्रिटेंड जॅकेट त्याच्या दिलखुलासपणाची आणि बिनधास्त स्वभावाचे प्रतीकच होते.