बॉबी क्रिस्टीना याहूची नायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:52 IST2016-01-16T01:11:20+5:302016-02-05T06:52:33+5:30

इंटरनेटवर कोणतीही गोष्ट हवी तेव्हा पाहण्यासाठी अनेकजण याहूला पसंती...

Bobby Christina Yamaha's heroine | बॉबी क्रिस्टीना याहूची नायिका

बॉबी क्रिस्टीना याहूची नायिका


/>                इंटरनेटवर कोणतीही गोष्ट हवी तेव्हा पाहण्यासाठी अनेकजण याहूला पसंती देतात.  २0१५ मध्ये याहूवर अनेकांनी फेमस गायिका बॉबी क्रिस्टीना ब्रोन हिला सर्च केल्याची माहिती याहूने दिली आहे. त्यामुळे यंदा बॉबी या याहूच्या हिरोईन ठरल्या आहेत. टॉप १0 सर्चमध्ये बॉबीचे नाव आहे. दिवंगत गायक विथनी हाउस्टन यांची ती मुलगी असून, याहूवर अनेकांनी तिला सर्वाधिक वेळा सर्च केले आहे. ब्रोन वयाच्या २२ व्या वर्षी हे जग सोडून गेली.
                       बाथटबमध्ये तिचा मृत्यू झाल्याचे सहा महिन्यांनंतर समोर आले होते. बॉबीनंतर आयफोन संबंधी माहितीसाठी याहूवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्याचे याहूने म्हटले आहे. अँपलने नवीन स्मार्टफोन बाजारात आणल्याने सप्टेंबरपासून त्यासाठी अनेकवेळा इंटरनेटवर सर्च करण्यात आले आहे. त्यानंतर कॅटलिन जेनरला अनेकांनी याहूवर सर्च केले आहे. केन्डल जेनरने यासाठी अधिक वेळा सर्च केल्याचे कंपनीने म्हटले आहे. सातव्या क्रमांकावर किम कर्दाशिएन आहे. त्यानंतर जेनिफर अनेस्टन, केटी पेरी, रोन्डा रुसी आणि सर्वात शेवटी फराह अब्राहमचा नंबर आहे.

Web Title: Bobby Christina Yamaha's heroine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.