मुलांच्या संगोपानाचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:08 IST2016-02-19T08:08:02+5:302016-02-19T01:08:02+5:30
मुलांचे संगोपन करताना आपल्या आरोग्यावर होऊ शकतात, असे संशोधकांना एका अध्ययनात आढळले आहे.

मुलांच्या संगोपानाचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम
प लक होण्याचा आनंद सर्वात मोठा असतो. त्याची तुलना कशाचीही केली जाऊ शकत नाही. इवलुशा पाऊलांनी आपल्या आयुष्यात आनंदाची लयलूट करणारे आपले मुलं कधी जगण्याचे कारण बनून जातात हे कळत नाही. असे सगळे असूनही लहान मुलाचा सांभाळ करणे काही सोपी गोष्ट नाही. रात्र रात्र जागणे, अपुरी झोप, तणाव, त्यांच्या मागे धावत धावत येणारा थकवा पालकांना सहन करावा लागतो.
पण त्याहून अधिक गंभीर परिणाम मुलांचे संगोपन करताना आपल्या आरोग्यावर होऊ शकतात, असे संशोधकांना एका अध्ययनात आढळले आहे. मुलांचा सांभाळ करताना, त्यांची काळजी घेत असताना आपली रोग प्रतिकारशक्तीवर कमी होते असे त्यांनी दावा केला आहे.
बेल्जियमच्या लेयुन विद्यापीठातील अॅड्रिएन लिस्टन यांनी सांगितले की, ‘संगोपन आणि पालकांची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध शोधून काढणारे हे पहिलेच अध्ययन आहे. मुलांना संगोपन करताना खर्ची पडणाºया ऊर्जा, वेळेचा आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम दिसून येतात. विशेष म्हणजे तापीचा संसर्ग आणि विकारांच्या जीवांणूपेक्षा जास्त हानी मुलांना वाढवताना होते.’
संशोधकांनी दोन वैयक्तिक व्यक्तींमधील संबंधाचा रोगप्रतिकारशक्तीवर होणाºया परिणामांचा सखोल अभ्यास करण्यासाठी २ ते ८६ वयोगटातील ६७० लोकांचा अभ्यास केला. मुलं असणाºया जोडप्यांची इम्युन सिस्टिममध्ये सुमारे ५० टक्क्यांनी घट झाल्याचे यावेळी दिसून आले.