बिप्सलाही वाटले होते इनसेक्युअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:20 IST2016-01-16T01:16:19+5:302016-02-06T12:20:38+5:30
हॉ ट अँण्ड सेक्सी बिपाशाला हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन जवळपास चौदा...

बिप्सलाही वाटले होते इनसेक्युअर
ह ट अँण्ड सेक्सी बिपाशाला हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन जवळपास चौदा वर्षांचा काळ उलटुन गेला आहे. या काळात तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. प्रत्येक वेळी भूमिकेत नाविण्य आणण्याचा तिचा विचार असतो. या बोल्ड अभिनेत्रीला तिच्या आयुष्यात इनसेक्युअर वाटल्याची कबुली तिने स्वत:च दिली आहे. बिप्स म्हणाली, 'राज ३ च्या वेळी मी माझ्या आयुष्यातले सगळे काही बदलुन कामाला पुन्हा एकदा सुरूवात केली होती. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होणार होता तेव्हा मला फार भिती वाटत होती. माझ्या आयुष्यतली ती 'इनसेक्युअर फेज' होती. माझ्या आयुष्यातली ती पहिलीच वेळ होती जेव्हा मला भिती वाटली.' मोठा पडदा गाजवल्यावर बिपाशाने तिचा मोर्चा आता छोट्या पडद्याकडेही वळवला आहे.