बिकिनी इन्स्पेक्टरची आॅफड्यूटी कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 19:42 IST2016-07-30T13:17:02+5:302016-07-30T19:42:13+5:30

पोलिस महिलेने सुटीच्या दिवशी मैत्रिणीसोंबत स्वच्छ सुर्यप्रकाशाचा आनंद घेत असताना एका मोबाईल चोराचा पाठलाग करून त्याला पकडले.

The Bikini Inspector's Affordable Max | बिकिनी इन्स्पेक्टरची आॅफड्यूटी कमाल

बिकिनी इन्स्पेक्टरची आॅफड्यूटी कमाल

वीडनमधील एका महिला पोलिसाची सध्या सर्वत्र कौतुक होत आहेत. कारण या पोलिस महिलेने सुटीच्या दिवशी मैत्रिणीसोंबत स्वच्छ सुर्यप्रकाशाचा आनंद घेत असताना एका मोबाईल चोराचा पाठलाग करून त्याला पकडले. विशेष म्हणजे तिने यावेळी केवळ बिकिनी परिधान केलेली होती. प्रसंगाची गांभीर्यता ओळखून तिने दाखवलेल्या शौर्याची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा होतेय.

मिकेला केल्नर असे तिचे नाव असून स्टॉकहोम शहरात तिच्या मैत्रिणींसोबत सुटी एन्जॉय करत होती. शहरातील रॅलाम्बशोव्ह पार्कमध्ये त्या सनबेथिंग घेत असताना एक व्यक्ती त्यांच्यापाशी मॅगझीन विकण्याच्या बहाण्याने आला. त्याच्याकडे पाहून मिकेलला थोडा संशय आला. त्या व्यक्तीने त्यांच्यासमोर काही मॅगझीन्स ठेवले. मिकेलने ते घेण्यास नकार दिला असता मॅगझीन उचलताना त्याने शितफीने मोबाईल चोरला.

हे जेव्हा तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आले तेव्हा मिकेल बिकिनीमध्येच त्या चोराच्या मागे धावली. पाठलाग करून तिने त्याला एक मैत्रिणीच्या सहाय्याने जमिनीवर पाडले. यावेळी तिच्या मैत्रिणीने काढलेल्या फोटोला इन्स्टाग्रामवर दोनच दिवसांत नऊ हजार लाईक्स मिळाल्या आहेत.

ती म्हणते, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. माझ्या या कृतीमुळे लोक अधिक सजग होतील, अशी मला आशा आहे. बिकिनीच काय मी कोणत्याही अवस्थेत मी चोराला पकडले असते.

Web Title: The Bikini Inspector's Affordable Max