BEAUTY SURVEY : लिपस्टिकचा रंग सांगतो मुलींच्या मनात काय आहे ते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 16:51 IST2017-02-14T10:11:18+5:302017-02-14T16:51:48+5:30

मुली ज्याप्रकारचा मेकअप करतात, त्यावरून त्यांच्या मनातील हालचालींचा म्हणजेच त्यांच्या ह्रदयातील विचारांचा वेध घेतला जाऊ शकतो. आज आपण मुलींच्या लिपस्टिकच्या रंगावरून त्यांच्या मनात काय सुरु असते याबाबत जाणून घेऊया.

BEAUTY SURVEY: What is the color of lipstick? | BEAUTY SURVEY : लिपस्टिकचा रंग सांगतो मुलींच्या मनात काय आहे ते !

BEAUTY SURVEY : लिपस्टिकचा रंग सांगतो मुलींच्या मनात काय आहे ते !

ong>-Ravindra More
असे म्हटले जाते की, एका महिलेच्या मनात काय विचार सुरु असतात, हे ओळखणे कठीण असते. मात्र बऱ्याचचदा मुली ज्याप्रकारचा मेकअप करतात, त्यावरून त्यांच्या मनातील हालचालींचा म्हणजेच त्यांच्या ह्रदयातील विचारांचा वेध घेतला जाऊ शकतो. आज आपण मुलींच्या लिपस्टिकच्या रंगावरून त्यांच्या मनात काय सुरु असते याबाबत जाणून घेऊया. 



* लाल रंग
चमकदार लाल रंगाची लिपस्टिक जास्त प्रमाणात वापरली जाते. या रंगाची लिपस्टिक लावणाऱ्या मुलींना आकर्षणाचे केंद्र व्हायला आवडते. आपणाकडे सर्वांचे लक्ष वेधले जावे असे त्यांना वाटते म्हणून त्या लाल लिपस्टिक वापरतात. शिवाय अशा मुली आत्मविश्वासीदेखील असतात. 



* वाइन रंग 
या रंगाची लिपस्टिक लावणाऱ्या मुली बोल्ड असतात. तसेच यांना मोठ्याने म्युझिक ऐकणे आवडते शिवाय अशा मुली लोकांना आकर्षित करण्यात पटाईत असतात. 



* फिकट गुलाबी
फिकट गुलाबी किंवा चमकदार आणि उठावदार गुलाबी रंंगाची लिपस्टिक लावणाऱ्या मुलींना धाडसी जीवन जगणे आवडते. शिवाय या मुली उत्साही आणि तेजस्वी समजल्या जातात. 



* बेबी पिंक
या रंगाची लिपस्टिक लावणाऱ्या मुली थोड्या कलात्मक असतात शिवाय त्यांचा स्वभाव सौम्य असतो. तसेच अशा मुली रोमॅँटिकही समजल्याही जातात. 



* मरून 
मरून रंगाची लिपस्टिक वापरणाऱ्या मुली साहसी असतात. या मुलींचा स्वभाव जरा कठोर असतो. अशा मुलींमध्ये कुशल नेतृत्व क्षमता असते.
 


* कोरल
हा रंग पसंत करणाऱ्या मुली आपल्या हक्कासाठी ताट उभ्या राहतात. अशा मुलींना समाजात आणि कार्यक्षेत्रात सन्मान मिळतो.

Web Title: BEAUTY SURVEY: What is the color of lipstick?