व्हिटॅमिन 'डी'च्या अभावामुळे एड्स उपचाराला बाधा - चार्ली शीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:09 IST2016-01-16T01:13:46+5:302016-02-07T07:09:31+5:30
व्हिटॅमिन 'डी'च्या अभावामुळे एड्स उपचाराला बाधाप्रसिद्धी अभिनेता चार्ली शीनने खुलासा केला.

व्हिटॅमिन 'डी'च्या अभावामुळे एड्स उपचाराला बाधा - चार्ली शीन
प रसिद्धी अभिनेता चार्ली शीनने खुलासा केला की तो गेली चार वर्षांपासून एचआयव्ही पीडित आहे. यावरून एड्सचा धोका वाढतच असल्याचे दिसते. केवळ गरीबच नाही तर श्रीमंत देशांतही एड्सची समस्या गंभीर होत आहे. त्यात भर म्हणजे एड्स पीडित व्यक्तीमध्ये जर व्हिटॅमिन 'डी'चा अभाव असेल तर उपचाराला बाधा निर्माण होते. जॉजिर्या विद्यापीठातील सहप्राध्यापक अमारा ईझिरमामा सांगतात की, 'एड्समुळे रोगप्रतिकारशक्ती खूप कमी होते. यावर ठोस उपाय जरी उपलब्ध नसला तरी उपलब्ध उपचारामुळे व्यक्तीच्या तब्येतीमध्ये बराच फरक पडतो. मात्र व्हिटॅमिन 'डी'च्या कमतरतेमुळे उपचारांची परिणामकारकताच कमी होते.' दीड वर्षांसाठी प्रा. ईझिरमामा यांनी ३९८ एचआयव्ही बाधित रुग्णांमधील व्हिटॅमिन 'डी'ची पातळी दर सहा महिन्यांनी मोजली असता हे निष्कर्ष निघाले.