अंतराळावीर स्कॉट केलीचे स्वानुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 20:52 IST2016-05-28T15:22:04+5:302016-05-28T20:52:04+5:30
स्कॉट केलीने स्पेस स्टेशनहून परत आल्यानंतर प्रथमच नासाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना अनुभव शेअर केले.

अंतराळावीर स्कॉट केलीचे स्वानुभव
अ तराळात सर्वाधिक काळ राहणाऱ्या स्कॉट केली या अंतराळवीराने स्पेस स्टेशनहून परत आल्यानंतर प्रथमच नासाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळातील अनुभव शेअर केले.
पृथ्वीवर परतून तीन महिने उलटल्यानंतरही त्यांच्या शरीराला येथील वातावरणाशी जुळून घेण्यास अडचणी येत आहेत. त्याला चालण्यास त्रास होतो तसेच खूप लवकर थकवा जाणवतो.
तो म्हणतो, 340 दिवसाच्या स्पेस मिशननंतर परत आल्यावर आपल्याला फार काही त्रास होत आहे, असे मी मुद्दामहून दाखविले नाही. मी तेवढा चांगला अभिनेता आहे. खरं तर मला त्यासाठी आॅस्कर पुरस्कार द्यायला हवा.
केलीने सांगितले की, त्याला त्वचेची जळजळ, पुरळ, ताप यांसारखा त्रास होत आहे; परंतु कितीही त्रास झाला तरी आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी असा धोका पत्कारणे गरजेचे आहे. आपल्याला जर मंगळावरस्वारी करण्यासाठी अवकाशात मानवी शरीरावर होणारे परिणाम होतात हे माहित असले पाहिजे. म्हणून अंतराळवीरांना ही जोखीम उचलणे अनिवार्य आहे.
नासाला 2030 पर्यंत मंगळवर माणूस पाठवायचा आहे. केली आता नासामधून निवृत्त झाला असून आपल्या अनुभवावर एक पुस्तक लिहित आहे. अवकाशात लगातार सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम केलीच्या नावावर आहे. इतर अंतराळवीर आणि नासा संशोधकांना प्रेरणा म्हणून तो सध्या विविध ठिकाणी स्वानुभव कथनाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे.