शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जॅकी चॅनने घेतले आलिशान विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 13:36 IST

मार्शल आर्ट सुपरस्टार जॅकी चॅनने एक आलिशान बिझनेस जेट विमान विकत घेतले आहे. 

काही दिवसांपूर्वी शाहरुख खान म्हणाला होता की, ‘एकाच वेळी फिल्मची निर्मिती आणि प्रायव्हेट जेट विकत घेणे मला परवडू नाही शकत.’ परंतु जणू काही त्याला खोटे पाडण्यासाठी मार्शल आर्ट सुपरस्टार जॅकी चॅनने एक आलिशान बिझनेस जेट विमान विकत घेतले आहे. एम्बे्रयर लेगसी ५०० असे त्या विमानाचे नाव असून चीनमध्ये असे विमान विकत घेणारा तो पहिला माणूस ठरला आहे. या विमानाची किंमत २० मिलियन डॉलर्स (१२० कोटी रु.) इतकी आहे. ‘एम्बे्रयर एक्झिक्युटिव्ह जेट्स’चे सीईओ आणि अध्यक्ष मार्को टुलियो पेलेग्रिनी यांनी सांगितले की, ‘लेगसी ५०० हे आतापर्यंतचे सर्वात अद्ययावत कॉर्पोरेट जेट आहे. दिसायला एकदम स्टायलिश आणि प्रवाशांच्या आरामाची सर्वोत्तम सोय व इंधनबचतीमध्येही उत्कृष्ट आहे. साईड स्टीक कंट्रोल असलेले हे त्याच्या आकारातील पहिले आणि एकमेव विमान आहे.’ सहा फूट उंच या विमानातून १२ प्रवासी प्रवास करू शकतात. यामध्ये कॅबिन मॅनेजमेंट सिस्टिम, सराऊंड साऊंड, हाय-डेफिनेशन एंटरटेनमेंट, आठ क्लब सीट्स जे ४ पलंगामध्ये रुपांतरित होतात अशा अनेक आरामदायी सुविधा आहेत. केवळ चार हजार फूट लांबीच्या धावपट्टीवरूनही लेगसी ५०० उड्डाण करू शकते. चार प्रवाशासोबत या विमानाची रेंज ५,७८८ इतकी आहे.४५ हजार फूट उंचावरून उडणाºया लेगसी ५०० मध्ये हनीवेल एचटीएफ७५००ई इंजिन लावण्यात आलेले आहे. इकोफे्रंडली इंजिन म्हणून ते ओळखले जाते. ‘हे विमान घेतल्यामुळे मी फार एक्सायटेड आहे. अशा प्रकारचे पहिलेच विमान मी विकत घेतले याचा आनंदसुद्धा वेगळा आहे’, असे जॅकी चॅन सांगतो.