दचकू नका! आता मुलांसाठीही बनियानपेक्षा शॉर्ट टॉप, यूजर्सनी उडवली खिल्ली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 14:58 IST2018-08-24T14:55:53+5:302018-08-24T14:58:57+5:30
फॅशनच्या विश्वात कधी कशाची क्रेझ वाढेल याचा काही नेम नाही. नेहमीच विचित्र डिझाइनचे कपडे बाजारात आलेले बघायला मिळतात. पण यावेळी जे आलंय ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

दचकू नका! आता मुलांसाठीही बनियानपेक्षा शॉर्ट टॉप, यूजर्सनी उडवली खिल्ली!
फॅशनच्या विश्वात कधी कशाची क्रेझ वाढेल याचा काही नेम नाही. नेहमीच विचित्र डिझाइनचे कपडे बाजारात आलेले बघायला मिळतात. पण यावेळी जे आलंय ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मुलींना कपड्यांच्या बाबतील क्रॉप टॉप, मिनी, स्विमविअर, मॅक्सी, शॉर्ट पॅट्स असे कितीतरी पर्याय असतात. पण मुलांना मात्र केवळ शॉर्ट्स आणि टी-शर्टवर समाधान मानावं लागतं. पण आता मुलांसाठी असे काही टॉप बाजारात आले आहेत की, तुम्हीही विचारात पडाल.
एका कंपनीने मुलांच्या दृष्टीकोनातून काही नवे डिझाइन आणले आहेत. ASOS नावाच्या ब्रॅन्डने मुलांसाटी क्रॉप टॉप आणला आहे. कंपनीने याला एक्सट्रीम क्रॉप टॉप नाव दिलंय. पहायला गेलं तर या क्रॉप टॉपला जरा जास्तच क्रॉप केलंय असं दिसतंय. या टॉपची किंमत १ हजार रुपये आहे.
इंटरनेटवर मुलांच्या या विचित्र टॉपमुळे एकच गोंधळ उडाला आहे. यूकेतील ऑनलाईन रिटेलरच्या या क्रॉप टॉपमध्ये छाती आणि पाठ पूर्णपणे उघडी राहते.
आता लोकांना आयतं कोलीतच मिळालं. लोकांनी यावर गंमतीदार कमेंट करायला सुरुवात केली आहे. काही यूजर्सनी तर याची तुलना स्पोर्ट्स ब्रा सोबत केलीये. इतकेच काय तर काहींनी याचे काही फोटोही शेअर केले आहेत.
एका यूजरने तर कमेंट केली की, यात जराही शंका नाहीये की, आता जगाचा अंत जवळ आला आहे. ASOS चा नवीन फॅशन ट्रेन्ड लोकांना काही पचनी पडत नाहीये.
पण काही फॅशन एक्सपर्टचं म्हणनं आहे की, याप्रकारे मेल क्रॉप टॉपवर टीका करणे हे दाखवतं की, लोक अजूनही जुन्या विचारांमध्ये अडकले आहेत.