कार्यक्षमता वाढविण्यासाठी विचारा ‘का?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 04:58 IST2016-03-13T11:58:54+5:302016-03-13T04:58:54+5:30

 स्वत:ला पाच वेळेस ‘असे का?’ हा प्रश्न विचारला.

Ask for increased efficiency? | कार्यक्षमता वाढविण्यासाठी विचारा ‘का?’

कार्यक्षमता वाढविण्यासाठी विचारा ‘का?’

फिसच्या कामातून कुटुंबियांसाठी काही वेळच उरत नाही. कसाबसा रविवारचा एक दिवस भेटतो, तोदेखील झोपेत निघून जातो. मग आयुष्यातील इतर गोष्टींसाठी वेळ कसा काढायचा? यावर तोडगा म्हणजे स्वत:ला एकच प्रश्न - ‘असे का होतेय?’  - पाच वेळेस विचारायचे.

चार्लस् डुहिगने त्याच्या ‘स्मार्टर फास्टर बेट’ या नव्या पुस्तकात हा मार्ग सांगितला आहे. तो लिहितो, माझ्या कुटुंबियांसोबत रात्रीचे जेवण घेणे मला का जमत नाही? हा माझ्यासमोर प्रश्न होता. मग मी टोयोटो कंपनीत वापरण्यात येणारी स्ट्रॅटेजी वापरली. स्वत:ला पाच वेळेस ‘असे का?’ हा प्रश्न विचारला.

मी कुटुंबियासोबत रात्रीचे जेवण का घेऊ शकत नाही?
- उशिरा पर्यंत आॅफिसमध्ये थांबावे लागते

का?
- कारण दिवसभरात मी आॅफिस काम संपवू नाही शकलो.

का?
- कारण मी आॅफिसला उशिरा आलो.

का?
- सकाळी मुलांना आवरण्यात वेळ गेला.

Charles Duhigg
चार्लस् डुहिग

अशी सगळी कारणे समोर आल्यावर मग चार्लस्ने रात्रीच मुलांचे सगळे कपडे, दफ्तर रेडी करून ठेवले. त्यामुळे तो वेळेवर आॅफिसमध्ये हजर झाला आणि वेळेत काम संपवून रात्री घरी लवकर पोहचू लागला. प्रॉब्लेम सॉल्व!

Web Title: Ask for increased efficiency?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.