अनुष्का शंकर ग्रॅमी अवॉर्डपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 01:23 IST2016-02-18T08:01:14+5:302016-02-18T01:23:36+5:30

ग्रॅमी पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकर पुरस्कारापासून वंचित राहिली. तिचे या पुरस्कारासाठी नामांकन झाले होते.

Anushka denied Shankar Grammy Award | अनुष्का शंकर ग्रॅमी अवॉर्डपासून वंचित

अनुष्का शंकर ग्रॅमी अवॉर्डपासून वंचित

ong>सोमवारी झालेल्या ग्रॅमी पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकर पुरस्कारापासून वंचित राहिली. तिचे या पुरस्कारासाठी नामांकन झाले होते.

यापूर्वी तिने एकदा हा पुरस्कार मिळवला होता. या समारंभात सहभागी होणारी आपण एकमेव भारतीय संगीतकार असल्याचे तिने म्हटले होते. तिच्या स्पर्धेत असलेल्या गायक अँजेलिक किडजो यांनी मात्र हा पुरस्कार अनुष्काला मिळायला हवा होता, असे म्हटले आहे. अनुष्का ही प्रसिद्ध दिवंगत सितारवादक प. रवीशंकर यांची कन्या आहे. तिला तिचा सोलो अल्बम ‘होम’ साठी बेस्ट वर्ल्ड म्युझिक अल्बम या विभागात नामांकन मिळाले होते.



नामांकन मिळण्याची अनुष्काची ही तब्बल पाचवी वेळ होती. भारतीय ब्रिटिश चित्रपट निर्माते आसिफ कापडिया यांनी  अ‍ॅमीसाठी बेस्ट म्युझिक फिल्म अवॉर्ड जिंकल्याबद्दल अनुष्काने त्यांचे अभिनंदन केले आहे. हा एक लघुपट असून तो गायक अ‍ॅमी वाईनहाऊस यांच्या जीवनावर आधारित आहे. हा लघुपट माझा अतिशय आवडीचा आहे, असे तिने म्हटले आहे.

नुष्काचा नवीन अल्बम ‘लॅण्ड आौफ गोल्ड’ तयार असून ती या अल्बमच्या प्रमोशनसाठी काही महिन्यांंत भारताच्या दौºयावर येणार आहे. आधी उत्तर अमेरिका, युरोप आणि त्यानंतर भारतात येणार असल्याचे तिने सांगितले. हा अल्बम 1 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

http://www.anoushkashankar.com/blog/anoushkas-latest-solo-album-home/

Web Title: Anushka denied Shankar Grammy Award