चिम्पॅझीने घेतले दुसर्या चिम्पॅझीचे मुल दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:21 IST2016-01-16T01:17:56+5:302016-02-07T07:21:19+5:30
मानवाची उत्पत्ती माकडांपासूनच झाली असे मानले जाते. त्यामुळे मानव आणि माकड यांच्या फार जवळचा संबध आह...

चिम्पॅझीने घेतले दुसर्या चिम्पॅझीचे मुल दत्तक
म नवाची उत्पत्ती माकडांपासूनच झाली असे मानले जाते. त्यामुळे मानव आणि माकड यांच्या फार जवळचा संबध आहे. चिम्पॅझी तर माकडांमध्ये सर्वात बुद्धीमान प्रजाती. अशा बुद्धीवान चिम्पॅझी मातेने दया, माया आणि करुणेचे एक अभिनव उदाहरण जगासमोर ठेवले आहे. ऑस्ट्रेलियातील प्राणीसंग्रहलयातील एका चिम्पॅझी मातेने नवजात पिल्लाला जन्म दिला. दुर्दैवाने मात्र ती माता जगू नाही शकली. सर्वांना आश्चर्यचकित करणार्या या घटनेत दुसर्या गर्भवती चिम्पॅझी मातेने हे पिल्लू 'दत्तक' घेतले. अँडीलेड येथील मोनाराटो प्राणीसंग्रहलयामध्ये बुधवारी ही घटना घडली. सुना नावाच्या मादा चिम्पॅझीने गेल्या आठवड्यात बून नावाच्या एका गोंडस पिलाला जन्म दिला होता. मात्र ती वाचू नाही शकली. या काळात तिच्यासोबत सतत राहणार्या झॉम्बी नावाच्या गर्भवती चिम्पॅझीने बूनला दत्तक घेतले. प्राणीसंग्रहलयाच्या लॉरा हॅन्ले म्हणतात की, मला तर नाही वाटत जगामध्ये यापूर्वी अशाप्रकारची घटना घडली असेल.