अँजेलिना जोलीवर प्राणीप्रेमींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 05:19 IST2016-01-16T01:09:34+5:302016-02-05T05:19:00+5:30
हॉलिवूड अँक्ट्रेस आणि मानवी हक्काच्या कार्यात अग्रेसर असलेल...

अँजेलिना जोलीवर प्राणीप्रेमींची टीका
ह लिवूड अँक्ट्रेस आणि मानवी हक्काच्या कार्यात अग्रेसर असलेल्या अँजेलिना जोलीला सध्या प्राणीप्रेमींच्या टीकेचा मारा सहन करावा लागत आहे. कंबोडिया देशात जोली चित्रपटाची शूटिंग करत आहे. तेथे तिच्यासोबत तिचे पाच मुलं देखील आहेत. या मुलांनी हत्तीवर मस्तपैकी सैर केल्याचे फोटो बाहेर आले आणि प्राणीप्रेमी तिच्यावर टीका करू लागले आहेत.
जोली जर मानवी हक्कासाठी लढते तर प्राण्यांच्या हक्काचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एलिफंट आशिया रेसक्यू आणि सर्व्हावल फाऊंडेशने सोशल मीडियावर विचारले की, अँजेलिना तू इतकी अनभिज्ञ आहेस का की तुला माहीत नाही की या हत्तींना किती निर्दयीपणे प्रशिक्षण दिले जाते? पर्यटनाच्या नावाखाली हत्तीवर होणारा हा अत्याचार आहे. पती बॅड्र पीटसह ती सध्या 'फस्र्ट दे टूक माय फादर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तिच्या स्टाफकडून स्पष्ट करण्यात आले की, अँजेलिनाला मुलांच्या या सैरबाबत तिला काही माहिती नव्हती.