ऑलराऊंडर दीपिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:23 IST2016-01-16T01:19:13+5:302016-02-09T08:23:16+5:30
ऑलराऊंडर दीपिका! भारताची अव्वल स्क्वॅश खेळाडू म्हणून दीपिका पल्लिकल प्रसिद्ध आहे. पण तिची ओळख एवढीच र्मयादित नाही. अर्जुन अवॉर्ड हा भारताच्या क्रीडाक्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार तिच्या नावे आहे
.jpg)
ऑलराऊंडर दीपिका!
भ रताची अव्वल स्क्वॅश खेळाडू म्हणून दीपिका पल्लिकल प्रसिद्ध आहे. पण तिची ओळख एवढीच र्मयादित नाही. अर्जुन अवॉर्ड हा भारताच्या क्रीडाक्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार तिच्या नावे आहे. जागतिक महिला स्क्वॅश खेळाडूंच्या 'टॉप टेन' यादीत स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. या जबरदस्त कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने दीपिकाला पद्मश्री पुरस्कारानेही गौरवले आहे. दीपिकाचे क्षेत्र केवळ खेळापर्यंतच र्मयादित नाही. ती प्रोफेशनल मॉडेल आहे आणि बिझनस वूमनदेखील! तिचा स्वत:चा लोगोदेखील आहे. वयाची चोविशी पार करेपर्यंत इतके कतरूत्व गाजवले असले तरी, दीपिका यावरच समाधानी नाही. तिला आणखी पुढे मजल मारायची आहे, पण पाय जमिनीवर ठेवून..
मल्याळी-सिरियन ख्रिश्चन कुटुंबात २१ सप्टेबर १९९१मध्ये जन्मलेल्या दीपिकाने सहाव्या वर्षापासून स्क्वॅश खेळायला प्रारंभ केला. लंडनमध्ये आपली पहिली व्यावसायिक स्पर्धा खेळली तेव्हा ती केवळ सहावीत होती. त्यानंतर लवकरच तिने र्जमन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, स्कॉटिश ओपन या ज्युनिअर स्तरावरील स्पर्धा जिंकून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. २0१२ मध्ये दीपिकाने जागतिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक दिली होती. २0१४मध्ये ज्योत्स्ना चिनप्पाच्या साथीत तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारातील सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.