ALERT : पेट्रोल भरतानाची फसवणूक टाळण्यासाठी "या" १० गोष्टी आहेत महत्वाच्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 18:32 IST2017-04-30T13:02:26+5:302017-04-30T18:32:26+5:30

आपलीही फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत.

ALERT: Important to avoid "these" 10 things to avoid fraud cheating! | ALERT : पेट्रोल भरतानाची फसवणूक टाळण्यासाठी "या" १० गोष्टी आहेत महत्वाच्या !

ALERT : पेट्रोल भरतानाची फसवणूक टाळण्यासाठी "या" १० गोष्टी आहेत महत्वाच्या !

ong>-Ravindra More
उत्तर प्रदेशची राजधानीत नुकतेच पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ‘एसटीएफ’ च्या टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. त्यात पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांनी एक लीटर पेट्रोलची किंमत मोजून ९४० ते ९५० एमएल पेट्रोलच मिळत होतं. म्हणजे लीटरमागे ५० ते ६० एमएल पेट्रोलची चोरी होत होती. रोज ४० ते ५० हजार रुपये यातून हे कमवत होते म्हणजेच महिन्याला १२ ते १५ लाख रुपये लोकांना फसवून हे कमवत होते.

आपलीही फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत. 
१. मीटरवर लक्ष ठेवा
जेव्हा तुम्ही तुमच्या गाडीत पेट्रोल किंवा डिझेल तेव्हा मीटरकडे लक्ष द्यावे. बºयाचदा आपण चारचाकी वाहनात पेट्रोल भरताना वाहनाच्या खाली उतरत नाही. याचा फायदा तेथील कर्मचारी घेतात. 

२. रिजर्व्ह लागण्याआधी भरा पेट्रोल 
रिकाम्या टँकमध्ये पेट्रोल भरल्याने नुकसान होतं, हे आपणास कदाचित माहित नसेल. टाकी खाली असल्यास त्यात अधिक प्रमाणात हवा असते. त्यामुळे तुम्ही पेट्रोल भरतात तर हवेमुळे पेट्रोल तुम्हाला कमी प्रमाणात मिळतं. त्यामुळे रिजर्व्ह लागण्यापूर्वी पेट्रोल भरा.

३. डिजीटल मीटर असणाºया पेट्रोल पंपवर पेट्रोल भरा 
जुन्या पेट्रोल पंप मशीनमध्ये गडबडी होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यासाठी पेट्रोल नेहमी डिजिटल मीटर असणाºया पंपावरच भरा. 

४. मीटरवर शुन्य नेहमी बघा 
पेट्रोल भरतांना ते रिसेट केलं गेलं की नाही ते नक्की पाहा. कारण काही पेट्रोल पंपाचे कर्मचारी तुम्ही जेवढी रक्कम सांगतात तेवढ्याचं पेट्रोल भरतात. यासाठी मीटर पूर्ण शुन्यावर आणलं की नाही यावर लक्ष असू द्या.

५. मीटर जोरात धावत असेल तर थांबवा
 पेट्रोल पंपवरच्या कर्मचाºयाला मीटरची स्पीड नार्मल करण्यासाठी सांगा. पेट्रोल भरतांना जर मीटर जोरात धावत असेल तर समजा काहीतरी गडबड आहे.

६. आॅटो कट लागल्यानंतर नका भरू पेट्रोल 
आॅटो कट झाल्यानंतर तुमच्या गाडीच्या टाकीत कमी पेट्रोल जातं.  टाकी फुल करतांना आॅटो कट लागल्यास पेट्रोल पंपवाले राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरु का असं सांगतात. पण त्यांचे ऐकु नका.  

७. मीटर बंद झाल्यानंतर लगेच पाईप काढू देऊ नका 
तुम्ही पाहिलं असेल की पेट्रोल पंपावर तेल भरल्यानंतर पाईप लगेच काढला जातो. कर्मचारी पेट्रोल टाकल्यानंतर आॅटो कट होताच पाईप गाडीच्या टाकीतून बाहेर काढतात. त्यामुळे पाईपमध्ये वाचलेलं पेट्रोल तुमच्या टाकीत जात नाही.

८. कधीही राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरु नका 
पेट्रोल पंप आधीच राउंड फिगरचे नंबर मशीनमध्ये फिक्स करुन ठेवतात. यामुळे जे लोकं ५०० किंवा १००० रुपयांचं पेट्रोल भरतात, त्यांचे नुकसान होते. यासाठी ५५० किंवा ११२५ अशा रुपयांचं पेट्रोल भरा. शक्य तेवढं डिजीटल पेमेंट करा. यामुळे पेट्रोल चोरी करणं अवघड होऊन जातं.

९. एकांताच्या पेट्रोल पंपवर जाऊ नका
एकांताच्या ठिकाणी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरु नका. कारण अशा ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते. यासाठी नेहमी अशा पेट्रोलपंपवर जाऊन पेट्रोल भरा जेथे नेहमी गाड्यांची वर्दळ असेल. अशा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतांना पाईपमधून आधी हवा बाहेर काढण्यासाठी सांगा. मग टाकीत पाईप टाकण्यास सांगा.

१०. शंका असल्यास तक्रार करा
जर तुम्हाला पेट्रोल चोरीची शंका आल्यास लगेचच पेट्रोल पंपच्या मॅनेजरकडून कंप्लेंट बुक मांगून लिखित तक्रार दाखल करा. जर तुम्हाला कंप्लेंट बुक दिलं जात नसेल तर कंपणीच्या कस्टमर केअरकडे तक्रार दाखल करा.

Web Title: ALERT: Important to avoid "these" 10 things to avoid fraud cheating!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.