मूल घेणार दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:58 IST2016-01-16T01:14:11+5:302016-02-07T10:58:22+5:30
मूल घेणार दत्तक अभिनेत्री लिंडसे लोहान मूल दत्तक घेत आहे.

मूल घेणार दत्तक
म ल घेणार दत्तक
अभिनेत्री लिंडसे लोहान मूल दत्तक घेत आहे. ती म्हणते की, मला लहान मुले खूप आवडतात, त्यामुळे मी एक मुलगा दत्तक घेऊ इच्छित आहे. माझ्यामुळे एका अनाथ मुलाला परिवार मिळेल. शिवाय त्याला माझे नावही देता येईल. त्याचबरोबर तिने लग्नाबाबतही तिचे मत स्पष्ट केले असून, लग्नाबाबत अजूनपर्यंत विचारच केला नसल्याचे ती सांगते. तसेच माझा कोणी जवळचा मित्र नाही. तसेच मला नात्यात राहणे पसंत नसल्याचेही लिंडसेने स्पष्ट केले आहे.
खोडकर टॉम क्रुझ
वेबसाईट 'पीपुल डॉट कॉम'च्या अनुसार टॉम क्रुझ अतिशय खोडकर अभिनेता असून, शूटिंगच्या दरम्यान सहकलाकारांची तो चांगलीच करमणूक करीत असतो. 'ओब्लिवियन' या चित्रपटातील सहअभिनेत्री एन्ड्रिया राइजबोरो सांगते की, शूटिंगच्या दरम्यान क्रुझ नेहमीच आनंदी राहत होता. शिवाय तो इतरानाही खूश ठेवत होता. त्याच्यात कमालिची नेतृत्त्व क्षमता आहे. मनानेही तो खूप चांगला माणूस असून, इतरांची नेहमीच काळजी घेत असतो.
पैटिंसन, स्टीवर्ट एकत्र
अभिनेता पैटिंसन आणि स्टीवर्ट यांनी एकत्रित सुट्टय़ा घालविल्याचे वृत्त कांटेक्टम्युझिक डॉट कॉम या वेबसाईटने दिले आहे. दिग्दर्शक रुपर्ट सैंडर्ससोबत स्टीवर्टचे प्रेम संबंध असल्याच्या बातम्यांमुळे पैटिंसन आणि स्टीवर्टमध्ये बिनसले होते.