इंटरनेटवर कार्तिकचाच स्वॅग; चाहत्यांनी दिला 'हॉटेस्ट मुंडा' टॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 18:13 IST2019-03-07T18:11:57+5:302019-03-07T18:13:28+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या नवख्या अभिनेत्यांपैकी कार्तिक आयर्नच्या नावाची चर्चा असल्याचे पाहायला मिळते. नुकत्याच रिलिज झालेल्या 'लुका चुप्पी' या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे चाहत्यांनी कार्तिकला चक्क डोक्यावरच घेतले आहे.

इंटरनेटवर कार्तिकचाच स्वॅग; चाहत्यांनी दिला 'हॉटेस्ट मुंडा' टॅग
सध्या बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या नवख्या अभिनेत्यांपैकी कार्तिक आयर्नच्या नावाची चर्चा असल्याचे पाहायला मिळते. नुकत्याच रिलिज झालेल्या 'लुका चुप्पी' या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे चाहत्यांनी कार्तिकला चक्क डोक्यावरच घेतले आहे, तर दुसरीकडे त्याचं नाव सारा अली खानसोबत जोडण्यात येत आहे. पण यासर्व गोष्टींपासून दूर एक गट असाही आहे, जो कार्तिकच्या फॅशनेबल आणि स्टायलिश लूकचा फॅन आहे. सध्या अनेक तरूणींच्या गळ्यातील ताईत असण्यासोबतच कार्तिक तरूणांचा स्टाइल आयकॉन बनला आहे. तुम्हीही कार्तिकचे हे फोटो पाहाल तर त्याच्या हॅन्डसम लूकचे फॅन व्हाल...
कार्तिकने आयर्नने बेन तेवरनिति अनरेवल (Ben Taverniti Unravel) हुडी आणि डीजलची जिन्स वेअर केली आहे. ब्लॅक आणि ऑरेंज कलरच्या या हुडीमध्ये त्याचा स्वॅग 'गली बॉय'पेक्षा कमी दिसत नाही.
कार्तिक आर्यन शेड्स म्हणजेच गॉगल्सचा फार शौकीन आहे. या फोटोमध्ये त्यांनी जे शेड्स वेअर केले आहेत त्यामुळे क्लासी लूक मिळत आहे.
कार्तिक एक पॉप्युलर अॅक्टर असून पब्लिक फिगर आहे. त्याने आपली हिच ओळख आपल्या फॅन्समध्ये फ्लॉन्ट केली आहे. त्याने 'PUBLIC FIGURE' असं लिहिलेल्या आपल्या जॅकेटचे फोटो शेअर केले आहेत.
कार्तिक आर्यन इन्फॉर्मल लूकमध्येही हॅन्डसम दिसत आहे.
कार्तिक डब्बू रतनानीच्या न्यू इयर कॅलेन्डरवरही दिसून आला होता. हे त्याच फोटोशूचटं एक क्लिक आहे, ज्यामध्ये कार्तिकवरून नजर हटवण जरा अवघडचं होत आहे.
फॉर्मल असो किंवा इन्फॉर्मल, कार्तिकला कोणताही लूक सूट होतो. त्याचा हा शेरवानी लूक पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल.
कार्तिकचा हॅन्डसम लूक :