या ७ अभिनेत्रींच्या लग्नातील साडीची किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 17:03 IST2018-08-08T17:02:37+5:302018-08-08T17:03:45+5:30

अभिनेत्री त्यांच्या लग्नाच्या कपड्यांवर किती खर्च करत असतील याचा त्यांच्या फॅन्सना नक्कीच प्रश्न पडत असेल. चला जाणून घेऊ त्यांच्या लग्नातील ड्रेसच्या किंमती.....

7 expensive wedding outfits worn Bollywood actresses wedding day | या ७ अभिनेत्रींच्या लग्नातील साडीची किंमत वाचून व्हाल थक्क!

या ७ अभिनेत्रींच्या लग्नातील साडीची किंमत वाचून व्हाल थक्क!

लग्न करणं हे जवळपास सर्वच मुलींचं स्वप्न असतं. प्रत्येक मुलगी आपलं लग्न यादगार करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स करत असते. प्रत्येकीला वाटत असतं ती तिच्या लग्नात सुंदर दिसावी. तिच्या लग्नाची तयारी शाही असावी, असंही अनेकींना वाटत असतं. सर्वसामान्य मुलींप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्रीही त्यांच्या लग्नाबाबत अनेक स्वप्ने बाळगून असतात. अभिनेत्री त्यांच्या लग्नाच्या कपड्यांवर किती खर्च करत असतील याचा त्यांच्या फॅन्सना नक्कीच प्रश्न पडत असेल. चला जाणून घेऊ त्यांच्या लग्नातील ड्रेसच्या किंमती.....

१) ऐश्वर्या राय 

विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने तिच्या लग्नात पिवळ्या आणि सोनेरी रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती. ही साडी नीता लुल्लाने डिझाइन केली होती. या साडीवर खऱ्या सोन्याच्या धाग्यांचं नक्षीकाम करण्यात आलं होतं. यावरुनच या साडीची किंमत किती असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. ऐश्वर्याच्या या साडीची किंमत ७५ लाख रुपये इतकी आहे. 

२) शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं लग्न २००९ मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत झालं होतं. शिल्पाचा लग्नातील लेहंगा तरुण तहिलियानी यांने डिझाइन केला होता. शिल्पाने तिच्या लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती. शिल्पाच्या या साडीची किंमत ५० लाख रुपये  होती. तर शिल्पाच्या एन्गेजमेंट रिंगची किंमत ३ कोटी रुपये इतकी होती. 

३) करिना कपूर

करिना कपूरने तिच्या लग्नात तिच्या सासूचा म्हणजेच शर्मिला टागोर यांचा जुन्या काळातील ड्रेस होता. हा ड्रेस पटोती खानदानातील पारंपारिक ड्रेस आहे. डिझायनर मनीष मल्होत्राने हा ड्रेस करिना कपूरच्या मापाने कस्टमाइज केला होता. या लेहेंग्याची किंमत ५० लाख रुपये होती.  

४) जेनेलिया डिसुझा

परफेक्ट कपल मानल्या जाणाऱ्या रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा यांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं.  जेनेलियाने नीता लुल्लाने डिझाइन केलेली साडी लग्नात नेसली होती. लाल आणि सोनेरी रंगाच्या या साडीवर सोनं आणि कुंदनचं काम केलं  गेलं होतं. या साडीची किंमत १७ लाख रुपये होती.

५) उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकरने तिच्या लग्नात मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला रीगल थ्रेड्स कलेक्शनचा एक सिल्क आणि बनारसी ब्रोकेड लेहेंगा परिधान केला होता. याच्या बॉर्डरला एक गोल्ड लेस लावण्यात आली होती. या लेहेंग्याची किंमत ४ लाख रुपये होती. 

६) बिपाशा बसु

बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोव्हर यांनी २०१६ मध्ये लग्न केलं होतं. बिपाशाने तिच्या लग्नात सब्यसाचीने डिझाइन केलेली ट्रेडिशनल लाल रंगाची बंगाली साडी नेसली होती. या साडीवर खऱ्या सोन्याच्या धाग्यांचं काम करण्यात आलं होतं. या साडीची किंमत ४ लाख रुपये होती. 

७) दीया मिर्झा

दीया मिर्झाने २०१४ मध्ये साहिल संघा याच्याशी लग्न केलं. तिने लग्नात हिरव्या आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. हा लेहेंगा रितु कुमारने डिझाइन केला होता. या लेहेंग्याची किंमत ३ लाख रुपये होती. 
 

Web Title: 7 expensive wedding outfits worn Bollywood actresses wedding day