Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 19:16 IST2026-04-09T19:15:37+5:302026-04-09T19:16:15+5:30

Bike Riding Fashion Tips: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? बाईकची सर्व्हिसिंग तर झाली असेलच, पण तुमच्या रायडर लूकचं काय? फॉलो करा खास टीप्स!

6 Essential Styling Tips to Look Cool and Stay Safe While Bike Riding | Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!

Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!

विकेंडला बाईक रायडिंगला जाणे अनेकांना आवडते. बाईकची कंडिशन तर आपण चेक करतोच, पण आपला 'रायडर लूक' कसा असावा, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. सुरक्षितता आणि स्टाईल यांचा योग्य मेळ बसला, तर रायडिंगचा आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे आज आपण बाइक रायडिंगसाठी काही हटके आणि ट्रेंडी फॅशन टिप्स जाणून घेणार आहोत.

बाईकवर कूल आणि डॅशिंग दिसण्यासाठी काय कराल?


हेल्मेट: हेल्मेट हे केवळ अपघातापासून वाचवण्यासाठी नसून ते ऊन, धूळ आणि वाऱ्यापासूनही तुमच्या चेहऱ्याचे रक्षण करते. आजकाल हेल्मेट हे रायडरच्या स्टाईलचा अविभाज्य भाग बनले आहे. सध्या मॅट फिनिश आणि गडद तसेच ब्राइट रंगाची हेल्मेट्स तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. स्टायलिश ग्राफिक डिझाईन्स असलेली हेल्मेट्स तुमच्या ओव्हरऑल रायडिंग लूकला एक वेगळीच ओळख मिळवून देतात.

जॅकेट: बाईक रायडिंगमध्ये जॅकेट हे केवळ फॅशनसाठी नसून ते सुरक्षेचे एक महत्त्वाचे कवच आहे. सध्या लेदर जॅकेट किंवा डेनिम जॅकेट रायडर्सची पहिली पसंती आहे. जर तुम्ही लांबच्या प्रवासाचे नियोजन करत असाल, तर खास रायडिंग गिअर असलेले जॅकेट निवडावे. हे जॅकेट तुम्हाला वेगवान वारा आणि धुळीपासून वाचवतेच, शिवाय अपघातासारख्या प्रसंगी शरीराचे संरक्षणही करते.

हँड ग्लोव्हज: लांबच्या प्रवासात सतत बाईक चालवल्यामुळे हातांना घाम येऊन हँडलवरील ग्रीप निसटण्याची भीती असते. अशा वेळी लेदर किंवा उच्च दर्जाच्या फॅब्रिकचे ग्लोव्हज वापरणे फायदेशीर ठरते. हे केवळ हातांच्या तळव्यांचे संरक्षण करत नाहीत, तर तुमच्या लूकला एक प्रोफेशनल आणि स्टायलिश टच देतात.

शूज: बाईक रायडिंग करताना पायांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. प्रवासात चप्पल, सँडल किंवा साधे कापडी शूज घालणे टाळावे. त्याऐवजी अँकल लेंथ शूज किंवा मजबूत स्पोर्ट्स शूज वापरावेत. हे शूज पायांना चांगली पकड देतात, ज्यामुळे गिअर बदलणे सोपे जाते. रस्ता कितीही खडतर असला, तरी हे शूज तुम्हाला स्टायलिश लूकसह सुरक्षा प्रदान करतात.

सनग्लासेस: प्रखर ऊन आणि रस्त्यावरील धूळ यांपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सनग्लासेस अत्यंत आवश्यक आहेत. बाईक रायडिंगसाठी एव्हीएटर किंवा वेफेअरर यांसारखे प्रकार नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. हे सनग्लासेस तुम्हाला एक 'डॅशिंग लूक' देतात आणि डोळ्यांना थंडावा मिळवून देतात.

कम्फर्टेबल जीन्स आणि कार्गो पँट्स: रायडिंग करताना तुमचे कपडे जितके स्टायलिश हवेत, तितकेच ते आरामदायी असणेही गरजेचे आहे. घट्ट कपड्यांऐवजी कार्गो पँट्स किंवा स्ट्रेचेबल डेनिम निवडा. यामुळे बाईक चालवताना पायांची हालचाल करणे सोपे जाते. डार्क रंगाच्या जीन्स तुमच्या रायडिंग लूकला अधिक बोल्ड आणि उठावदार बनवतात.

Web Title : बाइक राइड फैशन: इन स्टाइल टिप्स के साथ कूल और डैशिंग दिखें!

Web Summary : स्टाइलिश और सुरक्षित गियर के साथ अपनी बाइक राइड को बेहतर बनाएं। सुरक्षा के लिए हेलमेट, जैकेट, दस्ताने और मजबूत जूते को प्राथमिकता दें। सड़क पर कूल, डैशिंग लुक के लिए आरामदायक जींस और धूप का चश्मा चुनें।

Web Title : Bike Ride Fashion: Look Cool & Dashing with These Style Tips!

Web Summary : Elevate your bike ride with stylish and safe gear. Prioritize helmets, jackets, gloves, and sturdy shoes for protection. Choose comfortable jeans and sunglasses for a cool, dashing look on the road.