​‘4चॅन’ संस्थापक गुगलच्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 01:01 IST2016-03-09T08:01:21+5:302016-03-09T01:01:21+5:30

गुगलने वादग्रस्त वेबसाईट ‘4चॅन’चा संस्थापक क्रिस्टोफर पूलची मदत घ्यायची ठरवले आहे. 

The '4 Chan' founder helps Google | ​‘4चॅन’ संस्थापक गुगलच्या मदतीला

​‘4चॅन’ संस्थापक गुगलच्या मदतीला

टरनेट म्हणजे गुगल आणि गुगल म्हणजे इंटरनेट असे समीकरण आजच्या काळात तयार झालेले आहे. असे असुनही गुगलला सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात पाय रोवता आले नाहीत.

फेसबुक, ट्विटरची मक्तेदारी मोडून काढणे ‘गुगल’ अद्याप अपयशी ठरले आहे. म्हणूनच की काय कंपनीने आता वादग्रस्त वेबसाईट ‘4चॅन’चा संस्थापक क्रिस्टोफर पूलची मदत घ्यायची ठरवले आहे. इंटरनेट विश्वात ‘मूट’ नावाने प्रसिद्ध असलेला क्रिस्टोफरची गुगलमध्ये वर्णी लागणे टेकविश्वात चर्चेचा विषय झाला आहे.

वयाच्या १५ व्या वर्षी त्याने ‘4चॅन’ ही यूजर्र फोरम साईट सुरू केली होती. त्यावर निनावी यूजर्स कोणत्याही विषयावर त्यांचे मत, अ‍ॅनिमेशनल, आर्ट, मेमे पोस्ट करू शकत. अशा बिनधास्तपणामुळे अनेक वादग्रस्त पोस्ट, जोक्स ‘4चॅन’वर निर्माण झाले.

त्यातच 2014मध्ये अनेक सिलेब्रिटींचे नग्न छायाचित्रे ‘4चॅन’वर टाकण्यात आले होते. सुमारे बारा वर्षांनंतर क्रिस्टोफरने साईट सोडून गुगलशी हात मिळवणी केली आहे.

4chan

तो म्हणतो, गुगलच्या कर्मचाऱ्यांशी  भेटल्यावर त्यांची बुद्धीमत्ता, समर्पण, उत्साह, सृजनशीलता पाहून मी अतिशय प्रभावित झालो आहे. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझा अनुभव त्यांच्याशी शेअर करणे मला नक्कीच आवडेल.

आता क्रिस्टोफरच्या येण्यामुळे गुगलमध्ये वाद उद्भवू नये म्हणजे मिळवले.

Web Title: The '4 Chan' founder helps Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.