१०६ वर्षांच्या आजीबाईनी धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 06:36 IST2016-02-23T13:36:51+5:302016-02-23T06:36:51+5:30

कृष्णवर्णीय इतिहास महिन्याच्या निमित्ताने व्हाईट हाऊसमध्ये खास निमंत्रितांमध्ये आलेल्या १०६ वर्षी आजीबाईंनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांच्यासोबत नृत्य केले. १०६ वर्षांच्या वर्जिनिया मॅकलॉरिन यांचा उत्साह अवर्णनीय होता. त्यांचा तो उत्साह पाहून दस्तुरखुद्द ओबामांनीच त्यांना विचारले तुमच्या या उत्साहाचे रहस्य काय आहे? इतकेच नव्हे तर मलादेखील वृद्ध झाल्यानंतर तुमच्यासारखंच राहायचं आहे असे मिशेल ओबामांनी कौतुकाने म्हटले. व्हाईट हाऊसला आयुष्यात एकदा तरी भेट द्यायची असे माझे स्वप्न होते. या आयुष्यात ते पूर्ण होईल असे वाटत नव्हते परंतु ते आज पूर्ण झाले या शब्दात या आजीबार्इंनी आपला आनंद व्यक्त केला. २०१४ मध्ये त्यांनी एक अर्ज केला होता. त्यात त्यांनी व्हाईट हाऊसला भेट घेऊ देण्यात यावी अशी विनंती केली होती.

106-year-old Aajibhai held the contract | १०६ वर्षांच्या आजीबाईनी धरला ठेका

१०६ वर्षांच्या आजीबाईनी धरला ठेका

ष्णवर्णीय इतिहास महिन्याच्या निमित्ताने व्हाईट हाऊसमध्ये खास निमंत्रितांमध्ये आलेल्या १०६ वर्षी आजीबाईंनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांच्यासोबत नृत्य केले. १०६ वर्षांच्या वर्जिनिया मॅकलॉरिन यांचा उत्साह अवर्णनीय होता. त्यांचा तो उत्साह पाहून दस्तुरखुद्द ओबामांनीच त्यांना विचारले तुमच्या या उत्साहाचे रहस्य काय आहे? इतकेच नव्हे तर मलादेखील वृद्ध झाल्यानंतर तुमच्यासारखंच राहायचं आहे असे मिशेल ओबामांनी कौतुकाने म्हटले. व्हाईट हाऊसला आयुष्यात एकदा तरी भेट द्यायची असे माझे स्वप्न होते. या आयुष्यात ते पूर्ण होईल असे वाटत नव्हते परंतु ते आज पूर्ण झाले या शब्दात या आजीबार्इंनी आपला आनंद व्यक्त केला. २०१४ मध्ये त्यांनी एक अर्ज केला होता. त्यात त्यांनी व्हाईट हाऊसला भेट घेऊ देण्यात यावी अशी विनंती केली होती.

Web Title: 106-year-old Aajibhai held the contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.