Fact Check : बाजारात आलीय ३५० रुपयांची नवीन नोट? दावा करणारी पोस्ट बनावट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:26 IST2025-03-11T14:25:29+5:302025-03-11T14:26:00+5:30
Fact Check : नुकताच सोशल मीडियावर ३५० रुपयांच्या नोटांचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल फोटोत ३५० रुपयांच्या नोटांची बंडले दिसत आहेत.

Fact Check : बाजारात आलीय ३५० रुपयांची नवीन नोट? दावा करणारी पोस्ट बनावट
Created By: पीटीआय
Translated By: ऑनलाईन लोकमत
100, 200 रुपयांच्या नोटा सध्या चलनात आहेत. आणखी काही रकमेच्या नोटांचे फोटो व्हायरल करून बाजारात येणार असल्याचे दावे केले जातात. नुकताच सोशल मीडियावर ३५० रुपयांच्या नोटांचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल फोटोत ३५० रुपयांच्या नोटांची बंडले दिसत आहेत. हा दावा खोटा असल्याचे पीटीआय फॅक्ट चेकमध्ये समोर आले आहे.
फॅक्टचेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेने ३५० रुपयांच्या नवा नोटा जारी करण्याची सूचना जारी केलेली नाही, असे समोर आले आहे.
दावा:
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरील एका वापरकर्त्याने १० मार्च २०२५ रोजी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये लिहिले होते, "बाजारात एक नवीन गोष्ट आली आहे," ज्यामध्ये ३५० रुपयांच्या नोटा आणि दोन नोटांचे बंडल दिसत आहेत. पोस्ट लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.
दुसऱ्या एका वापरकर्त्याने ८ मार्च २०२५ रोजी फेसबुकवर त्याच दाव्यासह व्हायरल झालेला फोटो शेअर केला आहे.
पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने संबंधित कीवर्डसह गुगल ओपन सर्च केले परंतु त्यांना कोणताही विश्वासार्ह मीडियाची बातमी सापडली नाही. RBI च्या अधिकृत वेबसाइटवरही तपासले असता काहीही आढळले नाही. ३५० रुपयांच्या नोटेचे असे कोणतेही चित्र दिसले नाही.
आरबीआयच्या (एफएक्यू) विभागात चलनात असलेल्या नोटांमध्ये ₹१०, ₹२०, ₹५०, ₹१००, ₹२००, ₹५०० आणि ₹२००० च्या नमूद आहेत. यामुळे या सर्व सर्चवरून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ३५० रुपयांच्या नोटेची पोस्ट ही पूर्णपणे खोटी आहे, असे समोर येत आहे.
(सदर फॅक्ट चेक पीटीआय या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)