Fact Check: कुमार विश्वास यांनी खरंच उडवली का केजरीवालांची खिल्ली?; छे, 'तो' व्हिडीओ सहा वर्षांपूर्वीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 06:30 PM2024-04-01T18:30:14+5:302024-04-01T18:44:48+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर सोशल मीडियात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात कुमार विश्वास यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

Fact Check: Kumar Vishwas video is from six years ago its viral after arvind kejriwal arrested by ED | Fact Check: कुमार विश्वास यांनी खरंच उडवली का केजरीवालांची खिल्ली?; छे, 'तो' व्हिडीओ सहा वर्षांपूर्वीचा

Fact Check: कुमार विश्वास यांनी खरंच उडवली का केजरीवालांची खिल्ली?; छे, 'तो' व्हिडीओ सहा वर्षांपूर्वीचा

CreatedBy:'फॅक्ट क्रेसेंडो'
Translated By : ऑनलाइन लोकमत

सोशल मीडियावर कवी कुमार विश्वास यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कुमार विश्वास यांच्यासोबत अरविंद केजरीवाल दिसत आहेत. ज्यात केजरीवाल यांना ईडीचे अधिकारी अटक करताना दिसतात. त्याचसोबत व्हिडिओवर लिहिलंय की, "कवी की इतनी सटीक कल्पना, आप भी कहेंगे जोगीरा सारा रा रा" या व्हिडिओतून कवी कुमार विश्वास यांनी केजरीवालांच्या अटकेनंतर त्यांच्यावर गाणं गात निशाणा साधल्याचा दावा करण्यात आला आहे.

या व्हायरल पोस्टवर यूजरनं लिहिलंय की, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेल्या अरविंद केजरीवालांवर कुमार विश्वास यांनी त्यांच्या शैलीत टीका केली आहे.

ट्विटर / अर्काईव्ह


तपासणीत काय आढळलं?

या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी व्हायरल व्हिडिओचे विविध कि वर्ड गुगलमध्ये सर्च करण्यात आले. त्यात कुमार विश्वास यांचा हा व्हिडिओ न्यूज तक नावाच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित झालेला आढळला. हा व्हिडिओ २ मार्च २०१८ रोजी म्हणजे ६ वर्षापूर्वी अपलोड करण्यात आला होता. 

अर्काईव्ह

वस्तूस्थिती 

चॅनेलचा हा व्हिडिओ जवळपास ५ मिनिटे ३० सेकंदापासून व्हायरल झालेला पाहायला मिळतो. येथे कुमार विश्वास हे होळीच्या सोहळ्यानिमित्त जोगीरा गाणं गाताना दिसतात. छापील वृत्तानुसार, २०१८ मध्ये कुमार विश्वास यांनी या गाण्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. खाली हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. 


यातून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओचा सध्याच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कुमार विश्वास यांचा हा व्हिडिओ ६ वर्ष जुना आहे. त्याचा अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या अटकेवर काहीही देणंघेणं नाही. 

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर कुमार विश्वास यांची पहिली प्रतिक्रिया

कुमार विश्वास हे २०१४ मध्ये आम आदमी पार्टीसोबत म्हणजे अरविंद केजरीवालांसोबत होते. परंतु २०१७-१८ या काळात कुमार विश्वास आणि आप पक्षात वाद झाले आणि तेव्हापासून ते वेगळे होते. अलीकडेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्याशी निगडीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर कवी कुमार विश्वास यांनी रामचरित मानसमधील चारोळीच्या माध्यमातून भाष्य केले. 

अर्काईव्ह

निष्कर्ष  

व्हिडिओच्या पडताळणीत कुमार विश्वास यांचा हा व्हिडिओ अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतरचा नाही तर २०१८ चा आहे

(सदर फॅक्ट चेक 'फॅक्ट क्रेसेंडो' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे)
 

Web Title: Fact Check: Kumar Vishwas video is from six years ago its viral after arvind kejriwal arrested by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.