Fact Check: पंतप्रधान मोदींनी खरेच राष्ट्रपतींचा अपमान केला? फोटो खरा पण अर्धवट माहिती देणारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 16:34 IST2024-04-02T16:30:55+5:302024-04-02T16:34:27+5:30
Fact Check राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अडवाणी यांच्या निवासस्थानी त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला.

Fact Check: पंतप्रधान मोदींनी खरेच राष्ट्रपतींचा अपमान केला? फोटो खरा पण अर्धवट माहिती देणारा
Created By: boomlive
Translated By : ऑनलाइन लोकमत
माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना काही दिवसांपूर्वीच भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अडवाणी यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार दिला. यावेळी प्रकाशित झालेल्या एका फोटोवरून मोदी यांनी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा दावा समाजमाध्यमांवर केला जात होता.
याबाबत खरे-खोटे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ही टीका योग्य नसल्याचे आढळून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या फोटोमध्ये बसूनच राहिल्याचे दिसत आहे. तर मुर्मू या अडवाणी यांच्या बाजुला उभ्या आहेत. यावरून मोदी दलितांचा, महिलेचा सन्मान करत नसल्याची टीका केली जात होती. काँग्रेससोबत शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील या फोटोवर टीका केली होती. या ट्विटची लिंक इथे पाहू शकता...
हा फोटो जरी खरा असला तरी जे काही त्यातून दाखविले जात होते ते खरे नाही हे फॅक्ट चेकमध्ये समोर आले आहे. बुम लाईव्ह या वेबसाईटने याचा शोध घेतला आहे. अन्य काही व्यक्तींनी देखील ट्विटरवर या फोटोवरून लाजीरवाणे असल्याचे म्हटले होते. या ट्विटची लिंक इथे पाहू शकता...
कसे केले फॅक्ट चेक...
प्रत्यक्षात या समारंभाचे व्हिडीओ फुटेज तपासले असता त्यामध्ये अडवाणी यांच्या एका बाजुला पंतप्रधान मोदी आणि दुसऱ्या बाजुला मुर्मू खुर्चीवर बसल्या होत्या, असे दिसत आहे. मुर्मू या भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी उठल्यानंतरचा हा फोटो आहे. यावरून विरोधक मोदींवर टीका करत असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ मोदी यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेला आहे. याचे टायटल titled 'LIVE: President confers Bharat Ratna on Shri LK Advani Ji in PM Modi's presence' असे आहे. तसेच मुर्मू यांचे बसलेल्याचे अन्य फोटोही भाजप नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेले आहेत.
तुम्ही हा व्हिडीओ या लिंकवर पाहू शकता...
निष्कर्ष: सदरचा फोटो हा खरा असला तरी चुकीची माहिती किंवा अर्धवट माहिती देणारा असल्याचे समोर आले आहे.
(सदर फॅक्ट चेक 'बूम लाईव्ह' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)