शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:49 IST

विधानसभा निवडणुकीत नागपुरात EVM मशीनसह भाजपा कार्यकर्ते पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

Claim Review : नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पकडले.
Claimed By : Insta User-vandanaa_bharat_ki_beti
Fact Check : चूक

Created By: Vishvas NewsTranslated By: ऑनलाइन लोकमत

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. दरम्यान, नागपुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत भाजपाचे कार्यकर्ते EVM मशीनसोबत पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी EVM मशीन घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर  हल्ला केल्याचे म्हटले आहे. 

विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेला व्हिडीओ महाराष्ट्रातील नागपूरचा आहे, मात्र त्याबाबत करण्यात येत असलेला दावा चुकीचा आहे. ईव्हीएमसह ज्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले ते झोन अधिकाऱ्याचे वाहन होते, यामध्ये न वापरलेले ईव्हीएम ठेवण्यात आले होते.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी चार श्रेणींमध्ये विभागले आहेत, यामध्ये डी श्रेणीमध्ये न वापरलेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीचा समावेश आहे, जे सेक्टर किंवा झोनल किंवा एरिया मॅजिस्ट्रेटकडे आरक्षित आहेत आणि त्यांचा मतदानात वापर केला जात नाही.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

सोशल मिडिया वापरकर्ते ‘vandanaa_bharat_ki_beti’ ने व्हायरल व्हिडीओ (आर्काइव्ह लिंक) शेअर करत लिहिले की, "Big Breaking* खेल शुरू, काँग्रेसच्या लोकांनी झंडा चौक नागपुरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या भाजपच्या लोकांना पकडले. आताही @ECISVEEP म्हणेल की EVM सुरक्षित आहे, हे पाहून आपण एवढेच म्हणू शकतो की उद्या महाराष्ट्र आणि झारखंडचे निकाल तयार आहेत. मतमोजणी प्रक्रिया अद्याप बाकी आहे. गुप्ता यांनी अमित यांच्या मनातील गोष्ट सांगितली आहे. राजीव यांनी यापूर्वीच त्याची अंमलबजावणी केली आहे. मोदी हैं तो EVM हैं. अजूनही वेळ आहे, EVM वर करडी नजर ठेवा नाहीतर हरयाणासारखाच निकाल बघाल.

 सोशल  मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक वापरकर्ते या व्हिडीओला समोन दाव्यावर शेअर करत आहेत.

 

तपास

व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या वाहनात ईव्हीएम ठेवलेले दिसत आहे त्याचा नोंदणी क्रमांक 'MH19BU6027' आहे. या आधारे शोधलेल्या माहितीनुसार, हा महाराष्ट्रातील जळगाव येथील नोंदणीकृत क्रमांक आहे. 

 

व्हायरल व्हिडीओच्या मुख्य फ्रेम्स रिव्हर्स इमेज शोधत असताना, आम्हाला हा व्हिडीओ अनेक बातम्यांमध्ये दिसत असल्याचे आढळले, यानुसार हे नागपुरातील पोलिंग पार्टीवर हल्ल्याचे प्रकरण आहे, तेव्हा काही लोकांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या वाहनावर हल्ला केला होता. 

एबीपी लाईव्हच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओ बुलेटिनमध्ये या प्रकरणाबाबत नागपूरचे सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी यांच्या वक्तव्याचाही समावेश आहे. तांबोळी म्हणाले, "...त्यांच्या गाडीतील ईव्हीएम एक सुटे ईव्हीएम वापर न करता राखीव ठेवलेले होते.

आणखी एका व्हिडीओ अहवालातही अशाच संदर्भात घटनेचा उल्लेख आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या अहवालात तांबोळी यांच्या विधानाचा उल्लेख करण्यात आला आहे, यात त्यांनी म्हटले आहे की, “कोणतेही मूळ ईव्हीएम खराब झालेले नाही.” 

या संदर्भात आम्ही नागपूरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितले की, "हल्ला झालेल्या वाहनात ठेवलेले ईव्हीएम हे मतदानासाठी वापरलेले ईव्हीएम नसून राखीव ईव्हीएम होते."

यानंतर आम्ही नागपूर कोतवाली पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिस अधिकारी अतुल मोहनकर यांनी आम्हाला सांगितले की, "या निवडणूक अधिकाऱ्याच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली आहे."निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निवडणुकीनंतर सर्व उपलब्ध ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निवडणुकीनंतर सर्व उपलब्ध ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत.

श्रेणी A: मतदान केलेले EVM आणि VVPAT

पहिल्या वर्गात त्या EVM आणि VVPAT चा समावेश होतो, ज्याद्वारे मतदान झाले आहे आणि जे मतदान संपल्यानंतर बंद केले जातात.

श्रेणी B: सदोष मतदान EVM आणि VVPAT

यामध्ये त्या ईव्हीएमचा समावेश आहे, यामध्ये काही मतदान झाल्यानंतर बिघाड होतो.

श्रेणी C: सदोष मतदान न झालेले EVM आणि VVPAT

या प्रकारात ती यंत्रे ठेवली जातात जी निवडणुकीपूर्वी खराब होतात आणि बदलली जातात.

श्रेणी D: न वापरलेले EVM आणि VVPAT

या श्रेणीत येणारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन सेक्टर किंवा झोनल किंवा एरिया मॅजिस्ट्रेटकडे आहेत, जी सुरक्षित आहेत आणि मतदानात वापरली जात नाहीत.

यापूर्वी इतर निवडणुकांमध्ये असे दावे व्हायरल झाले आहेत. याआधी, लोकसभा निवडणुकीच्या वेळी वाराणसीमध्ये ईव्हीएममध्ये हेराफेरीचे असेच दावे व्हायरल झाले होते आणि आमच्या तपासणीत आम्हाला असे आढळले होते की प्रश्नातील ईव्हीएम हे मतमोजणीच्या प्रशिक्षणासाठी वापरलेले ईव्हीएम होते. यावेळी आम्ही वाराणसीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रणविजय सिंह यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी आम्हाला सांगितले, "निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व ईव्हीएम श्रेणी डी न वापरलेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी म्हणून वर्गीकृत केले गेले होते, जे निवडणुकीत वापरले जात नाहीत आणि निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएमसह एकाच स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जात नाहीत."

निष्कर्ष

नागपुरात निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएमसह भाजप कार्यकर्त्यांना पकडल्याचा दावा खोटा आहे. ईव्हीएमसह ज्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले ते झोनल ऑफिसरचे वाहन होते, यामध्ये न वापरलेले EVM ठेवण्यात आले होते. या श्रेणीत येणारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन सेक्टर किंवा झोनल किंवा एरिया मॅजिस्ट्रेटकडे आहेत, जे राखीव आहेत. ते मतदानात वापरले जात नाहीत. 

(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस