शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check : "भाजपा-महायुती आहे तर गती आहे, गुजरातची प्रगती आहे"; व्हायरल होणारा फोटो एडिटेड, 'हे' आहे 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:57 IST

Fact Check : महायुती महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या प्रगतीसाठी मतं मागत असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पोस्टरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Claim Review : भाजपा-महायुती आहे तर गती आहे, गुजरातची प्रगती आहे
Claimed By : Twitter User
Fact Check : चूक

Created By: The QuintTranslated By: ऑनलाइन लोकमत

महायुती महाराष्ट्रामध्येगुजरातच्या प्रगतीसाठी मतं मागत असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पोस्टरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो शेअर करणाऱ्यांनी  "गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपा महायुतीला मतदान करा…" असं मराठीमध्ये कॅप्शन दिलं आहे. या पोस्टला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या दाव्याच्या अर्काइव्ह लिंक येथे आणि येथे सापडतील.

हा फोटो खरा आहे का?

हा फोटो खरा नाही. प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी तो एडिट करण्यात आला आहे. मूळ फोटोमध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मतांसाठी युती दाखवण्यात आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर बारकाईने नजर टाकली असता  फोटोवर 'गुजरातची' हा शब्द मॉर्फ करण्यात आला होता हे दिसून येईल. 

काय आहे मूळ पोस्टर?

टीम वेबकूफने रिव्हर्स इमेज सर्च केली. ३ नोव्हेंबरला प्रवीण भानुशाली नावाच्या एक्स हँडलने अपलोड केलेला असाच एक फोटो सापडला. या व्यक्तीने स्वत:ला भारतीय जनता युवा मोर्चाचा सरचिटणीस म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी युती मतं मागत असल्याचं पोस्टरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. "भाजप-महायुती आहे, तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे" असं यावर लिहिलं आहे.

निष्कर्ष : व्हायरल दावा करण्यासाठी हा फोटो एडिट केल्याचं स्पष्ट झालं आहे.

(सदर फॅक्ट चेक The Quint या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.) 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण