शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

शून्य कार्बन उत्सर्जन हेच ‘पुणे पॅटर्न’चे ध्येय; पर्यावरणमंत्री पॅटर्न राज्यभर राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 5:26 PM

शहरात वाहनांची संख्या, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

- श्रीकिशन काळे पुणे : शहरात वाहनांची संख्या, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचा परिणाम हवामानावर होत आहे. येत्या काळात कर्ब उत्सर्जन कमी केले नाही, तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील. म्हणून पुण्यातील पुणे इंटरनॅशनल सेंटरने इतर संस्थांसोबत ‘पुणे टू कार्बन न्यूट्रल बाय २०३०’(शून्य कर्बभार पुणे २०३०)  हा अहवाल तयार केला असून, तो पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिला. तेव्हा पर्यावरणमंत्र्यांनी राज्यभर पुण्याचा हा शून्य कर्बभार पॅटर्न राबवू असे म्हटले आहे.पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) आणि सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन (सीईई) यांच्या पुढाकाराने क्लायमेट कलेक्टिव्ह पुणे (सीसीपी) स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये हवामान बदल साक्षरता वाढवण्याभर भर देण्यात येत असून, कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी विशेष आराखडा तयार करून तो नुकताच पर्यावरणमंत्री ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ‘पाथवे टू टेकिंग पुणे टू कार्बन न्यूट्रल बाय २०३०’ या नावाने अहवाल तयार केला आहे. त्यात येत्या २०३० पर्यंत कसे शहरावरील कर्बभार कमी करता येईल, यावर भर दिला आहे. आतापासून त्यासाठी प्रयत्न केले तर कुठे २०३० पर्यंत कर्ब उत्सर्जन कमी करण्यात यश मिळणार आहे. कारण संपूर्ण कर्ब शून्य करणे तर आता शक्य नाही. परंतु, काही प्रमाणात नागरिकांनी जीवनशैली बदलली, तर नक्कीच भविष्यात वाढणारे कर्ब उत्सर्जन कमी करता येईल, असे अहवालात नमूद आहे.पुणे हे भारतातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. जर विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये शून्य कर्बभार आवार ही संकल्पना रूजवली, तर पुण्यातील शिक्षणक्षेत्र संपूर्ण शहराला शून्य कर्बभाराच्या ध्येयाकडे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे सध्या समुचित-लया समूहातर्फेही कुकिंग फॉर क्लायमेट हा उपक्रम राबविला जात आहे. त्यातून कमीत कमी कर्ब उत्सर्जन करून स्वयंपाक कसा करता येईल, यावर भर आहे, अशी माहिती या समूहाच्या समन्वयक पुर्णिमा आगरकर यांनी दिली. पुण्यातूनच सुरुवात का ? पुणे मेट्रोपॉलिटनकडे वळत आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, तीन कॅँटोन्मेंट बोर्ड आणि हजारो गावे आहेत. हा संपूर्ण ७ हजार २५६ क्वेअर किलोमीटरचा परिसर असून, येत्या २०३० पर्यंत सुमारे १ कोटी ४० लाख लोकसंख्या होण्याची शक्यता आहे. इथे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हे ठिकाणी हा शून्य कर्बभार करण्यासाठी योग्य आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे काय ? वातावरणातील कार्बन अधिकाधिक शोषून घेणे आणि त्याच वेळी त्याचे उत्सर्जन होऊ न देणे म्हणजे कार्बन न्यूट्रॅलिटी होय. तसेच कमी कर्ब उत्सर्जनात जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी योग्य नियोजन करून नागरिकांनी स्वत: त्यावर भर देणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान येत असेल, तर त्यातून कमीत कमी कर्ब उत्सर्जन वातावरणात सोडायला हवे. नागरिकांनी इंधन जाळणा-या वाहनांचा वापर कमी करून ई-वाहनांना अधिक प्राधान्य द्यायला हवे. सार्वजनिक वाहतूकीचा वापर वाढविणे आवश्यक आहे. वाहतूकीसाठी शक्य तिथे सायकल वापरली पाहिजे. आताच अ‍ॅक्शन घेण्याची गरज का ? वातावरणात कार्बन डॉयऑक्साइडचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ३५० पीपीएम इतके आवश्यक आहे. परंतु सद्य:स्थितीला ते ४१० आहे. येत्या २०३० पर्यंत तर हे प्रमाण खूप होईल. त्यावर रोख घालणे आवश्यक आहे. जागतिक तापमानात ३ अंशाने वाढ होणार आहे. त्यात लोकसंख्या वाढत असल्याने भविष्यातील हवामान बदल भयंकर होतील. म्हणून आताच त्यावर उपाय करायला हवेत. कार्बन डायऑक्साइड वायू शोषून तो परत जीवाश्म स्वरूपात साठवून ठेवण्याची क्षमता झाडांमध्ये आहे. म्हणून झाडं जगविणे आवश्यक आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण