'नाशिक वनराई'मध्ये गिधाडांचा मनसोक्त पाहुणचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 09:48 PM2020-05-04T21:48:38+5:302020-05-04T21:56:31+5:30

लांब चोचीच्या गिधाडांचा उतरला थवा : शहराच्या वेशीवर निसर्गाच्या सफाई कामगारांचे वास्तव्य, दुर्लभ झालेल्या पाहुण्यांनी वीस वर्षानंतर दिले दर्शन

vultures came in nashik vanrai SSS | 'नाशिक वनराई'मध्ये गिधाडांचा मनसोक्त पाहुणचार

'नाशिक वनराई'मध्ये गिधाडांचा मनसोक्त पाहुणचार

googlenewsNext

नाशिकनाशिक शहराच्या वेशीवर म्हसरूळ शिवारात वन विभागाच्या गोदामच्या जागेवर साकारल्या जाणाऱ्या 'नाशिक वनराई'मध्ये सोमवारी (4 मे) सकाळी लांब चोचीच्या 50 ते 60 गिधाडांनी हजेरी लावून पाहुणचार घेतला. नामशेष होण्याच्या मार्गावर व संवर्धनाच्या धोकादायक स्थितीत पोहचलेल्या निसर्गाचे सफाई कामगार मानले जाणारी गिधाडे शहराच्याजवळ चांगल्या संख्येने दिसून येणे हे शहराच्या नैसर्गिक अन्नसाखळी विकसित होण्याच्या दृष्टीने शुभ वर्तमान मानले जात आहे.

गिधाडे म्हटली की सर्वसामान्य नागरिक चेहरा मुरडतात गिधाड पक्षी दिसायला कुरूप जरी असला तरी अन्नसाखळी त्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे अलीकडे भारतातून गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियमाच्या आधी सूची क्रमांक एकमध्ये यांचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी जागतिक गिधाड संवर्धन दिन साजरा केला जातो यामागचा उद्देश एकत आहे. अन्नसाखळीतील महत्त्वाच्या घटकाचे संवर्धन व्हावे त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती घडून यावी नाशिक शहर व परिसरात गिधाडे अपवादानेच आकाशात घिरट्या घालताना कधीतरी दिसून येत होती मात्र शहराबाहेर अंजनेरी ब्रह्मगिरी हरसुल वाघेरा घाट खोरीपाडा या भागांवर गिधाडांचे वास्तव्य पाहावयास मिळते अनेक वन्यजीव अभ्यासकांनी करून गिधाडांची घरटी देखील असल्याची नोंद केली आहे.

हरसूलपासून अलीकडे तीन किलोमीटर अंतरावर खोरीपाडा या आदिवासी वस्तीवरील नागरिकांनी व तेथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून चक्क गिधाडांचे उपहारगृह मागील सहा ते सात वर्षांपासून यशस्वी करून दाखविले आहे. खोरीपाडाच्या डोंगरावर सुमारे 200 पेक्षा अधिक गिधाडे आढळून येतात यामध्ये पांढऱ्या पाठीची व लांब चोचीची या दोन प्रजाती प्रामुख्याने आहेत. अधून-मधून इजिप्शियन गिधाड देखील उपहारगृहवर हजेरी लावतात मात्र त्यांची संख्या कमी आहे. शहरात वेशीवर कोठेही गिधाडे पहावयास मिळाली नव्हती दहा ते पंधरा वर्षांपूर्वी गोदा काठालगत टाकळी गाव सातपूर या भागांमध्ये झाडे दिसून येत होती मात्र मागील काही वर्षांपासून गिधाडांनी शहराच्या वेशीपासून आपले स्थलांतर ग्रामीण भागात केले, असे पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी सांगितले.

आपलं पर्यावरण संस्थेकडून विकसित केल्या जात असलेल्या नाशिक वनराईमधील वृक्षराजीने गिधाडांना आपल्याकडे आकर्षित करत येथील पाहुणचारासाठी जणू निमंत्रणच दिले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मृत झालेली बाळू जाणारे वनराई जवळील डोंगराच्या पायथ्याला टाकून दिल्यामुळे गिधाडांचा अफवा सकाळी 11 वाजेच्या सुमारास आपली भूक भागविण्यासाठी वनराईत दाखल झाला येथील खाद्यावर ताव मारून सुमारे तासभर 50 ते 60 गिधाडांनी आपली भूक भागविली. लॉकडाऊन काळात नागरिकांची रस्त्यांवरील कमी झालेली वर्दळ वाहनांचा थांबलेला गोंगाट यामुळे वन्यजीव देखील शहराजवळ नजरेस पडू लागले आहे गिधाडांच्या प्रजातीपैकी लांब चोचीची गिधाडे वनराईमध्ये तासभर मुक्कामास आली होती येथील सुरक्षारक्षक कुमार याने त्यांची छायाचित्रे अचूकरित्या टिपली कुमार हा नेहमीप्रमाणे सकाळी वनराई मधील झाडांना पाणी देत होता त्यावेळी त्याला विधानांचा मोठा थवा आकाशातून थेट वनराईत उतरल्याचे दिसून आले गिधाडांनी निवांतपणे येथील खाद्यावर आपली भूक भागविली आणि तासाभरानंतर पुन्हा डोंगराआड स्थलांतर केले. 

Web Title: vultures came in nashik vanrai SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.