शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

Plant Health Year 2020 : आपल्या आरोग्यासाठी जपा झाडांचेही आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 17:30 IST

मानव आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडांचे आरोग्य जपणे आवश्यक

ठळक मुद्दे२०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सने ‘प्लान्ट हेल्थ ईअर’ म्हणून घोषित केले आहे.युनायटेड नेशन्सतर्फे  शाश्वत विकास हे ध्येय गाठण्यासाठी २०३० हे वर्ष ठरविण्यात आले आहे.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : कीटकनाशके, रासायनिक खतांचा सातत्याने होणारा वापर याचा झाडांवर विपरीत परिणाम होत आहे. वरवर पाहता सगळे आलबेल वाटत असले तरी यामुळे झाडांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्नासाठी मानवजात झाडांवर अवलंबून असल्यामुळे कळत-नकळत मानवी शरीरावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे झाडांसाठी नाही, तर निदान स्वत:चे आरोग्य जपणे या स्वार्थी हेतूने तरी झाडांचे आरोग्य सांभाळा, असे आवाहन युनायटेड नेशन्सतर्फे जगभरातल्या लोकांना करण्यात आले आहे.

२०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सने ‘प्लान्ट हेल्थ ईअर’ म्हणून घोषित केले आहे. मानव आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडांचे आरोग्य जपणे आवश्यक असून, त्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे. याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यावर्षीची संकल्पना ‘झाडांचे आरोग्य’ याभोवती गुंफण्यात आली आहे. २०१७ साली संयुक्त राष्ट्राच्या सभेत ‘प्लान्ट हेल्थ’ विषयीचा ठराव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव फिनलँड देशाने मांडला

युनायटेड नेशन्सतर्फे २०२० वर्ष ‘प्लान्ट हेल्थ ईअर’ म्हणून घोषित‘संयुक्त राष्टाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे दिन आणि वर्षाची थीम’ ठरविली जाते मात्र त्यावर जगभराच्या दृष्टीने व्यापक प्रमाणावर उपाययोजना होत आहे, असे चित्र दिसत नाही. हेल्थ प्लान्ट या विषयासंदर्भात भारतात वैज्ञानिक संस्था, केंद्र आणि राज्य सरकारे तसेच शेती, पर्यावरण आणि  जैवविविधतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमध्येही अद्याप या विषयाची चर्चा सुरु असल्याचे दिसत नाही. 

शाश्वत विकासयुनायटेड नेशन्सतर्फे  शाश्वत विकास हे ध्येय गाठण्यासाठी २०३० हे वर्ष ठरविण्यात आले आहे. यासोबतच दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकास ही देखील आगामी काळातील उद्दिष्टे आहेत. या दिशेने जाण्यासाठीची सुरुवात अप्रत्यक्षपणे झाडांच्या आरोग्यातूनच होते. शाश्वत शेतीच्या माध्यमातूनच झाडांचे आरोग्य सांभाळता येईल. यासोबतच शाश्वत औद्योगिकीकरण,  शाश्वत जीवन, शाश्वत अन्न या संकल्पनाही महत्त्वाच्या आहेत. 

उद्देशसंयुक्त राष्ट्रसभेत ‘प्लान्ट हेल्थ’चा विषय चर्चेत आला त्यावेळी यासंबंधीच्या उद्देशांवरही चर्चा झाली. ‘प्लान्ट हेल्थ’ चा उद्देश काय असावा याचाही विचार झाला. केवळ रोपांचे जीवन एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही तर ‘प्लान्ट हेल्थ’ म्हणत असताना संपूर्ण मानवी जीवनाचा विचार करण्यात आला आहे. ‘प्लान्ट हेल्थ’ मुळे माणसाची भूक मिटेल, गरीबी दूर होईल, पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि अंतिमत: ही बाब मानवी आर्थिक विकासासाठी पूरक ठरेल. तज्ज्ञ म्हणतात...डॉ. रंजन गर्गे म्हणाले की, कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे मातीत विष कालविले जाते. हे विष फळ, धान्य, भाज्या या स्वरूपातून आपल्या शरीरात प्रवेश करते. यामुळेच कर्करोगाचे प्रमाण सध्या लक्षणीय वाढले आहे. यासोबतच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीतील नत्र, सल्फर, कार्बन यांचे प्रमाण बिघडते. मातीतील परिसंस्थांचा नाश होत असून, जैवविविधतेला धोका होत आहे. ट्रान्सजेनिक प्लान्टस् जणुकीय बदलातून वनस्पतींचे वाण निर्माण करणारा प्रकारही धोकादायक असून, त्यामुळे काही वर्षांनंतर केवळ कृत्रिम अन्न खाण्याची वेळच आपल्यावर येईल आणि आहारातील सकसता निघून जाईल. यातून कॅन्सरचे प्रमाण तर वाढेलच; पण अन्य आजारांनाही निमंत्रण मिळेल. याशिवाय पेट्रोल, डिझेल यांचा अतिवापरही ग्लोबल वार्मिंगला कारणीभूत ठरतो आहे. हे सर्व रोखायचे असेल, तर शाश्वत जीवनाकडे मार्गक्रमण केले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी शेती पद्धतीत आणि आपल्या आचरणात आमूलाग्र बदल करावा लागेल, असे गर्गे यांनी सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणEarthपृथ्वीpollutionप्रदूषणunited nationsसंयुक्त राष्ट्र संघAurangabadऔरंगाबाद