मानवी गरजांसाठी हवी आणखी एक पृथ्वी, सांगा कुठून आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 06:30 AM2023-08-06T06:30:28+5:302023-08-06T06:30:40+5:30

वर्षभर पुरणारी संसाधने ७ महिन्यांत होत आहेत फस्त

One more earth is needed for human needs, tell us where to get it? | मानवी गरजांसाठी हवी आणखी एक पृथ्वी, सांगा कुठून आणणार?

मानवी गरजांसाठी हवी आणखी एक पृथ्वी, सांगा कुठून आणणार?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मनुष्य जातीकडून पृथ्वीवरील स्रोतांचा बेसुमार वापर सुरू असून मानव जातीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सध्या १.७ पट अधिक पृथ्वीची गरज आहे. ग्लोबल फूटप्रिंट नेटवर्कच्या एका अहवालानुसार, पृथ्वीवरील वर्षभराच्या वापरासाठी असलेल्या साधनांचा वापर यंदा माणसांनी २ ऑगस्टपर्यंतच करून टाकला आहे. त्यामुळे याच वेगाने पृथ्वीवरील संसाधनांचा वापर होत राहिला तर मानवाला आणखी एका पृथ्वीची गरज भासणार आहे. विकासाच्या झापडबंद संकल्पनांमुळे अमेरिकेसारख्या देशाला आणखी चार पृथ्वी लागतील. 

कतारकडून सर्वाधिक शोषण 
कतारकडून पृथ्वीच्या साधनांचा वापर सर्वाधिक गतीने केला जात आहे. 
सर्व देशांनी कतारसारखी साधने वापरल्यास अर्थ ओव्हरशूट डे १० फेब्रुवारीलाच येईल. 
इंडोनेशिया, जमैका आणि बेनिन यांसारख्या देशांचा अर्थ ओव्हरशूट डे डिसेंबरला असतो.

अलिकडे सरकतो 
आहे अर्थ ओव्हरशूट डे 
nयंदा अर्थ ओव्हरशूट डे २ ऑगस्टला आला आहे. मानवी गरजांसाठी पृथ्वी वर्षभर पुरतील इतक्या संसाधनांची तजवीज करून ठेवत असते. आणि मानवाकडून ही संसाधने वापरून संपविली जातात. 
nत्या दिवसांपासून अर्थ ओव्हरशूट म्हणजेच संसाधनांचा अतिरिक्त वापर सुरू होतो. हे एकप्रकारे पृथ्वीचे शोषण असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ५ दिवस पुढे आहे. २०२० मध्ये तो २२ ऑगस्टला होता. 

कसा रोखणार साधनांचा वापर
शाकाहाराला प्राधान्य जेवणात मांसाचे प्रमाण ५० % कमी केल्यास अर्थ ओव्हरशूट डे १५ दिवस पुढे जाईल. पृथ्वी हिरवीगार राहू  शकेल. 
अन्न नासाडी टाळणे : अन्न नासाडी रोखल्यास अर्थ ओव्हरशूट डे १० दिवस पुढे जाईल. त्यामुळे अन्नाची नासाडी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

भारतासारखे इतर ५१ विकसनशील देशांकडून मात्र, संसाधनांचा तितका 
वापर होताना दिसत नाही. त्यामुळे हा समतोल साधला जात आहे. भारतात संसाधनांचा केवळ ७० टक्के वापर केला जात आहे. 
 

Web Title: One more earth is needed for human needs, tell us where to get it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी