शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष स्वागतासाठी स्तुत्य उपक्रम; मुलांनी केलं प्लास्टिक हद्दपार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 12:36 IST

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी निसर्गात असलेलं प्लास्टिक बाहेर काढणं महत्त्वाचं आहे.

प्रगती जाधव-पाटील

सातारा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी निसर्गात असलेलं प्लास्टिक बाहेर काढणं महत्त्वाचं आहे. हेच हेरून कऱ्हाड पालिका आणि फ्रेंडस् नेचर क्लबच्यावतीने घरातील प्लास्टिक गोळा करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी तब्बल २ टन प्लास्टिकचा कचरा गोळा केला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जातात; पण पुढच्या पिढीला पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील बनविताना त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी कऱ्हाड नगरपालिका आणि एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गादीच्या खाली, स्वपयंपाक घरात यासह घरात ठिकठिकाणी असलेलं प्लास्टिक शोधून विद्यार्थ्यांनी शाळेत आणून जमा केलं. सर्वाधिक प्लास्टिक घराबाहेर काढणाऱ्या विद्यार्थ्याचा अनोखा गौरव मंगळवारी (३१ डिसेंबर) दुपारी तीन वाजता पालिकेच्या सभागृहात होणार आहे. शहरातील १५ माध्यमिक शाळेतून सुमारे १२ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. त्यांनी शासनाने बंदी घातलेलं सर्व प्लास्टिक घरातून बाहेर काढून शाळेत जमा केलं.

येणारे २०२० साल प्लास्टिकमुक्त म्हणून त्याचे स्वागत करूया. या सर्व कामामध्ये गुंतले आहेत. शंभरहून अधिक कर्मचारी, क्लबचे सर्व पदाधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरुकता निर्माण करण्याचा हा उपक्रम आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिक गोळा करून पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढं टाकले आहे. पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण करण्याच्या या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- जालिंदर काशीद

प्लास्टिक फ्री होममध्ये सहभागी शाळा...!

कऱ्हाड शहरातील विटामाता विद्यालय, उर्दू हायस्कूल, टिळक हायस्कूल, कन्या शाळा, का. ना. पालकर  शाळा माध्यमिक, महाराष्ट्र हायस्कूल, यशवंत हायस्कूल, संत तुकाराम हायस्कूल, केशवराव पवार स्कूल,  कऱ्हाड नगरपालिका शाळा ३, सरस्वती विद्यामंदिर, वाखाण, एसएमएस इंग्लिश मीडियम स्कूल, नूतन मराठी शाळा, शिवाजी विद्यालय या शाळांनी उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.नेचर इन निड, कऱ्हाड

- १२ हजार विद्यार्थी- १५ शाळा- १०० आरोग्य कर्मचारी- २ टन प्लास्टिक कचरा गोळा 

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसरSchoolशाळाPlastic banप्लॅस्टिक बंदीStudentविद्यार्थी