शहरातील तिन्ही जागा मिळवण्यासाठी भाजपाने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले आणि तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील तिन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या. अखेर त्या तिन्ही जागा भाजपाने जिंकल्या. विशेषत: नाशिक पूर्वमधील जागा जिंकल्याने पालकमंत्र्यांची सरशी ...
सेनेची बंडखोरी व पंचरंगी लढतीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपने सलग दुसऱ्यांचा विजयश्री खेचून आणली असून, अतिशय अटी-तटीच्या लढतीत ९७११ मताधिक्क्याने आमदार सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. ...
येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणेसह विजयी उमेदवारांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांच्या घोषणांनी मतमोजणी परिसर दणाणला होता. शहरातील पश्चिम, मध्य, पूर्व व देवळाली या सर्व मतदारसंघांत विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जयघोष करत विजयाचा आनंद साजरा केला. ...
पूर्व मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून झालेला गोंधळ, घोषणाबाजीमुळे निर्माण झालेला तणाव वगळता विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) शहरात कडेकोट पोलीस व निमलष्करी दलाच्या बंदोबस्तात शांततेत पार पडली. ...
Maharashtra Assembly Election 2019जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी ७० अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमावले; परंतु एकाचेही भाग्य उजळले नाही. ...
विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटपानंतर राज्यभरात शिवसेना-भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आणि नाशिक शहरातील तीनही जागा भाजपलाच सोडण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. ...