नमिता मुंदडा यांच्या अंबाजोगाई शहरातील प्रचाराचा शुभारंभ बुधवारी दुपारी अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात महाआरती व श्रीफळ फोडून करण्यात आला. ...
फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...
सगळे बिघडलेले पुतणे पवारांनी आपल्या घरात घेतले आणि तीच सवय त्यांच्या घराला लागली, असा टोला आ.सुरेश धस यांनी शरद पवार, अजित पवार काका-पुतण्यांना लागावला. ...
स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...
शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ...