राज्यात BSc नर्सिंगच्या ७ कॉलेजमध्ये शून्य प्रवेश; अनेक ठिकाणी पुरेसे विद्यार्थीच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 09:55 IST2026-01-22T09:55:25+5:302026-01-22T09:55:59+5:30

४४ ठिकाणी २० टक्केही प्रवेश नसतानाही १३२ नव्या कॉलेजचे प्रस्ताव

Zero admissions in 7 BSc Nursing colleges in the state; Many places do not have enough students | राज्यात BSc नर्सिंगच्या ७ कॉलेजमध्ये शून्य प्रवेश; अनेक ठिकाणी पुरेसे विद्यार्थीच नाहीत

राज्यात BSc नर्सिंगच्या ७ कॉलेजमध्ये शून्य प्रवेश; अनेक ठिकाणी पुरेसे विद्यार्थीच नाहीत

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात बी. एससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याने अनेक महाविद्यालयांत पुरेशा संख्येने विद्यार्थी दाखल झाले नाहीत. सात महाविद्यालयांत तर एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश झाला नसून, ४४ महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेच्या २० टक्केही विद्यार्थी मिळाले नाहीत. या परिस्थितीतही २०२६-२७ वर्षासाठी नर्सिंगच्या १३२ कॉलेजांचे प्रस्ताव सादर झाल्याने पुढील वर्षी रिक्त जागांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

यंदा २९४ महाविद्यालयांत १६,५३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये १०,९५७ जागांवर प्रवेश झाले, तर ५,५७३ जागा रिक्त राहिल्या. २०२३-२४ वर्षात बी.एससी नर्सिंगच्या महाविद्यालयांची संख्या १८३ होती. तीन वर्षांत ही संख्या १११ ने वाढून २०२५-२६ मध्ये २९४ झाली. ३ वर्षांत नर्सिंगच्या जागा ७२०० ने वाढल्या. २०२३-२४ मध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ९,३३० जागा होत्या. त्यावर्षी बीएससी नर्सिंगला ७,१८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. गेल्यावर्षी २०२४-२५ मध्ये जागांमध्ये वाढ होऊन त्या ११,२८० पर्यंत पोहोचल्या. 

दहापेक्षा कमी... 

राज्यातील केवळ दहापर्यंतच विद्यार्थी मिळालेली सांगली जिल्ह्यातील सात महाविद्यालयं आहेत. त्याखालोखाल अहिल्यानगरमधील ६, कोल्हापूरमधील ६, बीडमधील ४ आणि यवतमाळमधील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

१० हजार नर्सेची आवश्यकता असते. आता बीएससी नर्सिंगच्या जागा १६ हजार ५०० पर्यंत गेल्या आहेत. आधीचे ३,६०० जागांच्या वाढीचे आणि आगामी वर्षासाठी नव्याने १३२ नव्या महाविद्यालयांचे प्रस्ताव सरकारकडे आहेत. त्यातून नर्सिंगच्या जागा २० हजारांपुढे जाणार असून, बी.एड फार्मसीपेक्षा नर्सिंगच्या महाविद्यालयांची वाईट स्थिती होणार आहे.  
डॉ. बाळासाहेब पवार, 
अध्यक्ष, खासगी नर्सिंग स्कूल ॲण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन

आतापर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 

Web Title : 7 बीएससी नर्सिंग कॉलेजों में शून्य प्रवेश; छात्रों की कमी

Web Summary : महाराष्ट्र में बीएससी नर्सिंग कॉलेजों की संख्या बढ़ी, पर सात में शून्य प्रवेश हुए। कई में छात्र कम हैं, जिससे नए 132 कॉलेजों के प्रस्तावों से भविष्य में रिक्तियों की चिंता है। सीटें बढ़ने पर भी कई खाली, बी.एड फार्मेसी जैसी स्थिति।

Web Title : Zero Admissions in 7 BSc Nursing Colleges; Shortage of Students

Web Summary : Maharashtra sees BSc nursing college surge, but seven colleges had zero admissions. Many lack students, raising concerns about future vacancies with 132 new college proposals. Despite increased seats, many remain vacant, mirroring B.Ed and pharmacy issues.