Digital University: डिजिटल विद्यापीठ म्हणजे नेमके काय असते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 10:32 IST2022-02-03T10:31:37+5:302022-02-03T10:32:08+5:30
Digital University: कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. त्याचाच आधार घेत आता देशात डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याविषयीची घोषणा करण्यात आली.

Digital University: डिजिटल विद्यापीठ म्हणजे नेमके काय असते?
कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. त्याचाच आधार घेत आता देशात डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याविषयीची घोषणा करण्यात आली.
डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय?
- विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम आणि पदवीचे शिक्षण पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणारे व्यासपीठ म्हणजे डिजिटल विद्यापीठ होय.
- शिक्षणासाठी आवश्यक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल विद्यापीठ देशातील अन्य केंद्रीय विद्यापीठांशी समन्वय साधून काम करेल.
- या विद्यापीठात कोणकोणते अभ्यासक्रम शिकवले जातील,
हे अद्याप स्पष्ट नाही.
- डिजिटल विद्यापीठात तंत्रशिक्षणाला अधिक प्राधान्य दिले जाईल, अशी अटकळ आहे.
- शहरी तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही या विद्यापीठामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण प्राप्त होऊ शकेल.
असे असेल विद्यापीठ
- इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात हे विद्यापीठ स्थापन होईल.
- विविध भारतीय भाषांमध्ये ऑनलाइन शिक्षण घेता येऊ शकेल.
- हब-स्पोक नेटवर्क प्रारूपावर हे विद्यापीठ कार्यरत असेल.
हब-स्पोक नेटवर्क प्रारूप म्हणजे?
-हे एक असे प्रारूप आहे की ज्यात सर्व प्रक्रिया एका केंद्रीभूत हबवरून पार पडते व त्याचा लाभ अखेरच्या टप्प्यातील ग्राहकाला, म्हणजे स्पोक, होतो.
- थोडक्यात डिजिटल विद्यापीठ या एका कॅम्पसमधून शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात असतील.
- देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचा मान केरळकडे आहे. दुसरे राजस्थानात सुरू झाले.
जगातील टॉप १० डिजिटल विद्यापीठे
-जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, अमेरिका
- एडिनबरो विद्यापीठ, स्कॉटलंड
- मँचेस्टर विद्यापीठ, ब्रिटन
- सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया
- किंग्ज कॉलेज लंडन, ब्रिटन.
- ग्लास्गो विद्यापीठ, स्कॉटलंड
- युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन, ब्रिटन
- नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ, अमेरिका
- कोलम्बिया विद्यापीठ, अमेरिका
- कॅलिफोर्निया विद्यापीठ, अमेरिका