VITEEE 2026 प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:58 IST2025-10-28T10:51:51+5:302025-10-28T10:58:39+5:30
VITEEE 2026 साठी २८ एप्रिल २०२६ ते ३ मे २०२६ या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे

VITEEE 2026 प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध
वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) तर्फे VITEEE 2026 या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना आता www.viteee.vit.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना VIT च्या वेल्लोर, चेन्नई, अमरावती आणि भोपाळ येथील कॅम्पसमध्ये उपलब्ध असलेल्या प्रमुख अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे.
VITEEE 2026 साठी २८ एप्रिल २०२६ ते ३ मे २०२६ या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे. देशभरातील १३४ परीक्षा केंद्रांबरोबरच ९ आंतरराष्ट्रीय केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे परीक्षास्थळ निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे.
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, उद्योगांसोबत चांगला संपर्क आणि रोजगाराच्या उत्कृष्ट संधी यामुळे VIT संस्थेला भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांपैकी एक मानले जाते.