UPSC Marks 2023: UPSC उतीर्ण उमेदवारांचे मार्क जाहीर, टॉपर इशिताला किती गुण मिळाले? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 19:34 IST2023-05-24T19:33:22+5:302023-05-24T19:34:17+5:30
UPSC CSE Final Result 2023: UPSC Civil Service फायनल परीक्षेचे मार्क जाहीर झाले आहेत.

UPSC Marks 2023: UPSC उतीर्ण उमेदवारांचे मार्क जाहीर, टॉपर इशिताला किती गुण मिळाले? जाणून घ्या...
UPSC CSE Final Marks 2023:केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा अंतिम परीक्षेचे गुण जाहीर केले आहेत. UPSC CSE 2022 चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यावर्षी ग्रेटर नोएडा येथील इशिता किशोरने भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. इशिताला एकूण 1094 गुण मिळाले आहेत.
UPSC नागरी सेवांच्या अंतिम परीक्षेतील मुलाखत 18 मे 2023 पर्यंत चालली. मुलाखतीच्या अवघ्या 5 दिवसांनी अंतिम निकाल जाहीर झाला. यावर्षी 933 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तसेच, सर्व उत्तीर्ण उमेदवारांचे गुणही जाहीर झाले आहेत. गुण तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जावे लागेल.
- मार्कशीट घेण्यासाठी UPSC च्या वेबसाइट upsc.gov.in वर जा.
- मेन पेजवरील What’s New या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर Marks of Recommended Candidates लिंकवर जावे लागेल.
- निवडलेल्या उमेदवारांची गुणपत्रिका PDF स्वरूपात उघडेल.
- तुमचा रोल नंबर किंवा नाव शोधून तुम्ही तुमची मार्कशीट तपासू शकता.
UPSC टॉपर्स मार्कशीट
- रँक 1- इशिता किशोर - 1094 गुण
- रँक 2- गरिमा लोहिया- 1063 गुण
- रँक 3- उमा हरती एन- 1060 गुण
- रँक 4- स्मृती मिश्रा - 1055 गुण
- रँक 5- मयूर हजारिका - 1054 गुण
- रँक 6- गेहना नवीन रत्न- 1054 गुण
- रँक 7- वसीम अहमद भट्ट- 1053 गुण
- रँक 8- अनिरुद्ध यादव - 1051 गुण
- रँक 9- कनिका गोयल - 1045 गुण
- रँक 10- राहुल श्रीवास्तव- 1043 गुण
यावर्षी युपीएससी टॉपर्सच्या यादीत 6 मुलींची नावे पहिल्या दहामध्ये आहेत. ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असलेल्या इशिता किशोर पहिली असून, दुसऱ्या क्रमांकावर बिहारच्या बक्सर येथील गरिमा लोहियाचे नाव आहे. तर, आसाम तेजपूरचे मयूर हजारिका पुरुष उमेदवारांमध्ये अव्वल ठरले आहेत.