शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Teacher: ‘आपले गुरुजी’ विरोधात शिक्षकांच्या काळ्या फिती, फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 09:14 IST

Teacher: ‘आपले गुरुजी’ मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या विरोधात शिक्षक भारतीच्या वतीने काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले होते.

मुंबई : ‘आपले गुरुजी’ मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या विरोधात शिक्षक भारतीच्या वतीने काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी राज्यभर बहुसंख्य शाळांमध्ये शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले. या विषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

शिक्षण आयुक्तांनी राज्यातील शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना ‘ए फॉर साईज पेपर’वर शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे आदेश दिलेले आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या दोन्ही घटना समाज व्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत. सरकारी पातळीवर शिक्षकांना जाणीवपूर्वक बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी शिक्षक भारतीच्या सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हाध्यक्ष यांची बैठक पार पडली. या बैठकीत सोमवारी काळ्या फिती लावून काम करण्याचा तसेच सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हा तर शिक्षकांचा अपमानविद्यार्थ्यांच्या उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या काम आणि अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सरकारी स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे काम केले किंवा नाही, याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हावे, त्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणांना अधिक सक्षम करायला हवे, असे मत शिक्षक मांडत आहेत.  ९९.९९ टक्के शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत असून, केवळ अपवादात्मक प्रकरणात कामचुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांमुळे सर्वांना जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही, अशा प्रतिक्रिया शिक्षकांमधून उमटत आहेत. दोषी शिक्षकांवर होणाऱ्या कारवाईचे कोणीही समर्थन करणार नाही, असे शिक्षक भारतीने स्पष्ट केले.  

 

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षक