विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! ‘सीईटी’च्या प्रवेश परीक्षा २४ मार्चपासून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:34 IST2026-03-13T10:33:45+5:302026-03-13T10:34:15+5:30

यंदा सीईटी परीक्षांना २४ मार्चपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना त्यानुसार परीक्षेचे नियोजन करता येणार आहे. 

Students, start studying! CET entrance exam from March 24 | विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! ‘सीईटी’च्या प्रवेश परीक्षा २४ मार्चपासून 

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! ‘सीईटी’च्या प्रवेश परीक्षा २४ मार्चपासून 

मुंबई :  राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेतल्या जाणारी एलएलबी ३ वर्ष आणि ५ वर्ष, बी. एड्. (जनरल व स्पेशल) व बी. एड्. (इएलसीटी), बीपीएड्, एम. एड्., एमपीएड् व बी. एड्. एम. एड्. या सात अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या अंतिम तारखा जाहीर  केल्या आहेत. त्यानुसार यंदा सीईटी परीक्षांना २४ मार्चपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना त्यानुसार परीक्षेचे नियोजन करता येणार आहे. 

सीईटी सेलने तारखा जाहीर केलेल्या सात अभ्यासक्रमांपैकी सहा प्रवेश परीक्षांची प्रवेश नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील एलएलबी ५ वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची नोंदणी १५ मार्चपर्यंत सुरू आहे. या परीक्षा १७ मेपर्यंत घेण्याचे नियोजन आहे. दरम्यान, सीईटी सेल मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील ४५ दिवसांच्या कालावधीत या प्रवेश परीक्षा घेणार आहे. सद्यस्थितीत सर्व १७ प्रवेश परीक्षांना मिळून  १२ लाख ९४ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, दोन्ही संधी मिळून १७ लाख ४२ हजार ०६० विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. 

प्रवेशपत्र ऑनलाइन

एमपीएड्     २४ मार्च, 
एमपीएड् (फिल्ड टेस्ट ऑफलाईन) - २५ मार्च, 
एम. एड्. - २५ मार्च, 
बी.एड्. (जनरल व स्पेशल ) बी.एड्. (इएलसीटी) - २७ ते २९ मार्च, 
एलएलबी (३ वर्ष) १ ते २ एप्रिल, 
बीपीएड् - ४ एप्रिल, 
बीपीएड् - (फिल्ड टेस्ट ऑफलाईन) - ५ ते ७  एप्रिल, 
बी.एड्.  एम.एड्. (३ वर्ष एकात्मिक अभ्यासक्रम) - ९  एप्रिल, 
एलएलबी ५ वर्ष - ८ मे राेजी प्रवेश परीक्षा हाेणार आहेत. 

परीक्षांची प्रवेशपत्रे काही दिवस आधी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन उपलब्ध हाेणार आहे. प्रवेशपत्राची माहिती व सूचनांसाठी नियमितपणे सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. 

Web Title : सीईटी प्रवेश परीक्षा 24 मार्च से शुरू: छात्रों, कमर कस लें!

Web Summary : महाराष्ट्र सीईटी सेल ने 24 मार्च से शुरू होने वाले विभिन्न पाठ्यक्रमों के लिए प्रवेश परीक्षा की तारीखों की घोषणा की। एलएलबी (5 वर्ष) के लिए पंजीकरण 15 मार्च तक खुला है। परीक्षाएँ 17 मई तक आयोजित की जाएंगी। प्रवेश पत्र ऑनलाइन उपलब्ध होंगे। अपडेट के लिए आधिकारिक वेबसाइट देखें।

Web Title : CET Entrance Exams Start March 24: Students, Gear Up!

Web Summary : Maharashtra CET Cell announces entrance exam dates for various courses starting March 24. Registration is open until March 15 for LLB (5 years). Exams will be held until May 17. Admit cards will be available online. Check the official website for updates.

टॅग्स :examपरीक्षा