शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

सीईटीच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना भीती; परीक्षेचे वेळापत्रक कधी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 07:26 IST

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून होतेय परीक्षेच्या आराखड्याची मागणी : इतर मंडळांचे विद्यार्थी म्हणतात त्यांचा अभ्यासक्रम आम्हाला का? 

ठळक मुद्देएससीईआरटी व शिक्षण मंडळाने यावर उपाययोजना करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावाशिक्षकांकडे आणि मुख्याध्यापकांकडे तयारी कशी करावी? प्रश्न कसे असतील, काठिण्यपातळी कशी असेल, अशा प्रश्नांची विचारणा आपल्याला कमी गुण मिळाल्यास अकरावी प्रवेशाच्या स्पर्धेत आपण मागे पडू, अशी भीती

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या अभ्यासक्रमावरून राज्य मंडळ आणि सीबीएसई, आयसीएसई, आयबी यांसारख्या इतर मंडळांच्या विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी आहे. सीईटीच्या परीक्षा पद्धतीच्या फरकामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे तर पडणार नाहीत ना, अशी भीती आता पालकांसह मुख्याध्यापकांकडूनही व्यक्त होत आहे.

शिक्षण मंडळाने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंचाची तयारी करावी किंवा त्यांना अभ्यासक्रम, प्रश्नांचा आराखडा समजावून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे. राज्य मंडळाच्या बोर्डाचा दहावीचा अभ्यासक्रम हा इतर बोर्डांच्या तुलनेत दोन वर्षे मागे आहे. त्यामुळे तो अभ्यासणे इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी अवघड नाही. उलट आतापर्यंत दहावीसाठी दीर्घोत्तरी प्रश्नांची तयारी केलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना आता बहुपर्यायी उत्तरांची तयारी करणे अवघड जात असल्याची माहिती मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली. विद्यार्थी, पालक शिक्षकांकडे आणि मुख्याध्यापकांकडे तयारी कशी करावी? प्रश्न कसे असतील, काठिण्यपातळी कशी असेल, अशा प्रश्नांची विचारणा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. एससीईआरटी व शिक्षण मंडळाने यावर उपाययोजना करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा आपल्याला कमी गुण मिळाल्यास अकरावी प्रवेशाच्या स्पर्धेत आपण मागे पडू, अशी भीती वाटत असताना दुसरीकडे इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांनाही आपला दहावीचा अभ्यासक्रम वेगळा असताना राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी कशी देणार? असा प्रश्न पडला आहे. सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ राज्य मंडळाचा अभ्यासक्रम ठेवणे, हा भेदभाव आहे. यासंदर्भात इतर मंडळांसाठी राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी का, अशी विचारणा करणारी याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आधी कोरोना व आता पूरपरिस्थिती यामुळे सीईटी परीक्षेच्या नियोजनात काही अडथळे येत असल्याची माहिती मिळत आहे. पुढील आठवड्यापर्यंत या परीक्षेबाबत स्पष्टता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

बारावीच्या निकालाचीही तारीख ठरेनाबारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असून, राज्य शिक्षण मंडळ स्तरावर त्यावर काम सुरू असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. मात्र, निकाल जाहीर होण्याची निश्चित तारीख सांगू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निकाल वेळेत लागावा यासाठी मंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीईटीचे वेळापत्रक कधी येणार?राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. बारावीचा निकालही येत्या काही दिवसांत जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने परीक्षांच्या तारखा आणि वेळापत्रक लवकर जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे.सीईटी सेलकडून बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी अर्ज नोंदणीची मुदत संपली आहे. मात्र, अद्याप त्या परीक्षांच्या वेळापत्रका-बाबत माहिती देण्यात न आल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. 

बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, कृषी आणि इतर विद्या शाखांच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य आहे. यंदा एकूण ४ लाख ६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जुलै संपत आला तरी अद्याप परीक्षांचे वेळापत्रक नसल्याने विद्यार्थी, पालकांना सीईटी परीक्षा आणखी लांबणार का, अशी भीती वाटू लागली आहे. परीक्षा लांबल्यास पुढील प्रवेश प्रक्रियेलाही उशीर होऊन शैक्षणिक वर्ष लांबण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आणि त्यासंदर्भातील सूचना लक्षात घेता सीईटी परीक्षा लवकर होऊन प्रवेशाचा मार्ग मोकळा व्हावा, अशी इच्छा विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :ssc examदहावी