शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

ऑनलाइन वर्गाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मारली दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 08:41 IST

केवळ २५ ते ३० टक्के उपस्थिती; किलबिलाटाचा आवाज शिक्षकांकडून म्युट

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विदर्भ वगळता राज्यातील शाळांचा नवीन शैक्षणिक वर्षातला मंगळवारचा पहिला ऑनलाइन वर्ग भरला खरा, मात्र विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी मारलेली दांडी आणि ओळख करून देण्याच्या वेळी इतर विद्यार्थ्यांचा आवाज शिक्षकांनी म्युट केल्याने ऑफलाइन शाळेतील किलबिलाट ऐकायला मिळाला नाही. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची केवळ २५ ते ३० टक्केच उपस्थिती हाेती.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही शाळा ऑनलाइनच सुरू झाली. मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव पांडुरंग केंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन वर्गाच्या पहिल्याच दिवशी फार कमी म्हणजे सुमारे २० ते २५ टक्केच विद्यार्थी हजर हाेेते. त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करीत शिक्षण विभागाने मागच्या वर्षीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत २ तासांत ४ तासिकांचे नियोजन केले हाेते. त्यानुसार शिक्षकांनी आपापले वर्ग घेतले. पुढच्या काही दिवसांत एससीईआरटीने दिलेल्या सूचनांप्रमाणे त्यांची उजळणी घ्यायचे नियोजन असले तरी ते कोणत्या घटकांचे, किती वेळ, कोणत्या विद्यार्थ्यांचे याबाबत सूचना नसल्याने शिक्षकांसमाेर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नवीन अभ्यासक्रमाचीही पुस्तके नसल्याने नवीन अभ्यासक्रम तासिकांचे नियोजन करण्यातही डचणी येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

ब्रिज कोर्स अद्याप नाही, मात्र मुंबईत जून, जुलैचे नियोजन देण्याच्या सूचनाउजळणीसाठी शिक्षण विभागाकडून विषयनिहाय शाळांना ब्रिज कोर्स देण्यात येणार आहे. तो अद्याप आला नसला तरी जून व जुलै महिन्याच्या ऑनलाइन शिक्षणाच्या वेळापत्रकाचे नियोजन करून शिक्षण विभागाला देण्याच्या सूचना शिक्षण निरीक्षकांकडून देण्यात आल्या आहेत. एकेका शिक्षकाकडे ५ ते ६ वर्ग असतात, त्यात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांच्या संकलनाचे कामही शिक्षकांकडे असताना शिक्षकांनी ही तारेवरची कसरत कशी करावी, असा प्रश्न भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी उपस्थित केला.

धाेरणात स्पष्टता आणणे गरजेचे !nपहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती शाळांत अनिवार्य करण्यात आली आहे. शाळांमध्ये उपस्थिती अनिवार्य केल्यास आम्ही इतर वर्गांच्या ऑनलाईन शिकवण्या कशा घ्यायच्या? दहावीचे मूल्यांकन वेळेत कसे पूर्ण करायचे ? असे प्रश्न शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी उपस्थित केले. nशिक्षण विभागाने आपल्या धोरणात स्पष्टता आणावी आणि मगच शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Schoolशाळा