केंद्र सरकारच्या विविध विभागात 17 हजार पदांवर बंपर भरती; वाचा संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 04:27 PM2024-06-25T16:27:10+5:302024-06-25T16:27:19+5:30

24 जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ती 24 जुलैपर्यंत चालणार आहे.

SSC CGL Recruitment 2024 : Bumper recruitment for 17 thousand posts in various departments of Central Government; Read full details | केंद्र सरकारच्या विविध विभागात 17 हजार पदांवर बंपर भरती; वाचा संपूर्ण माहिती...

केंद्र सरकारच्या विविध विभागात 17 हजार पदांवर बंपर भरती; वाचा संपूर्ण माहिती...

SSC CGL Recruitment 2024 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) संयुक्त पदवी स्तर (CGL) 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. SSC CGL भरती अंतर्गत विविध विभागांमध्ये 17 हजारांहून अधिक रिक्त पदे भरली जातील. 24 जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ती 24 जुलैपर्यंत चालणार आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ssc.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकता. जाणून घ्या भरतीची संपूर्ण प्रक्रिया...

SSC CGL परीक्षा दोन स्तरांवर घेण्यात येते. टियर 1 सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये घेण्यात येईल, तर टियर 2 परीक्षा 2 डिसेंबर रोजी होईल. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना भारत सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग, संस्था आणि न्यायाधिकरणांमध्ये गट 'ब' आणि गट 'क' पदांवर नियुक्त केले जाईल.

या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा

 • अर्ज भरण्याची तारीख- 24 जून ते 24 जुलै 2024
 • परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख- 25 जुलै 2024
 • अर्जात बदल करण्याची शेवटची तारीख- 10 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 
 • टियर 1 परीक्षा तारीख- सप्टेंबर-ऑक्टोबर 2024
 • टियर 2 परीक्षा तारीख- डिसेंबर 2024

वयोमर्यादा
उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर पदे दिली जातील. जे उमेदवार त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षात आहेत, ते देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 32 वर्षे आणि किमान वय 18 वर्षे असावे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

 • सर्व प्रथम SSC च्या अधिकृत वेबसाइट https://ssc.gov.in/ वर जा.
 • यानंतर “ऑनलाइन अर्ज” लिंकवर क्लिक करा.
 • आता "नवीन नोंदणी" बटणावर क्लिक करा.
 • आवश्यक माहिती भरा आणि नोंदणी करा.
 • तुमचा नोंदणी आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करा आणि अर्ज भरा.
 • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
 • अर्ज फी भरा.

शैक्षणिक पात्रता
उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असावा. जे उमेदवार सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी पदासाठी अर्ज करत आहेत, त्यांच्याकडे पदवी आणि CA/CS/MBA/Cost & Management Accountant/Commerce Masters/Business Studies मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (JSO) या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर पदवी (12 वी मध्ये किमान 60% गणित) आवश्यक आहे.

अर्ज फी
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये जमा करावे लागतील. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PWBD) आणि माजी सैनिकांना कुठलीही फी लागणार नाही. तुम्ही ऑनलाईन BHIM UPI, Net Banking, Visa, MasterCard, Maestro किंवा RuPay डेबिट कार्ड वापरुन फी भरू शकता. 

Web Title: SSC CGL Recruitment 2024 : Bumper recruitment for 17 thousand posts in various departments of Central Government; Read full details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.