शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुंबईतील शाळाही ४ ऑक्टोबरपासून अनलॉक; शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 06:45 IST

पालिका शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी

ठळक मुद्देपालिका शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी

मुंबई : अखेर मुंबईतील शाळाही ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शहरातील महापालिका शाळा, खासगी व्यवस्थापन, इतर मंडळांच्या शाळांना ८वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे.

मुंबई क्षेत्रातील शाळा सुरू करण्याआधी शाळांनी योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे, असे निर्देश पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. याशिवाय शाळा सुरु करण्याआधी व केल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांची योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही शाळा व्यवस्थापनांना करण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहायक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडिअम हायपोक्लोराइड सोल्युशनने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. 

खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी आपल्या स्तरावर निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना पालिका शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ज्या शाळा आतापर्यंत कोविड १९चे केंद्र, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र म्हणून वापरात आहेत, त्यांचे स्थलांतर करून शाळा वापरण्यायोग्य स्थितीत आणण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत.

शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचनाकोविड सेंटर, रेल्वे स्थानकात लसीकरण केंद्रात, प्रमाणपत्रे पडताळणी तसेच निवडणूक कामांसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांनाही कार्यमुक्त करावे, असे निर्देश तडवी यांनी दिले आहेत. महापालिकेच्या आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी जवळच्या महापालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्राशी शाळा संलग्न करण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.

पालिका शाळांची पूर्वतयारी झाली 

  • शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थीसंख्या पाहून वर्ग एका दिवसाआड भरवायचे की कसे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. 
  • दरम्यान, राज्य शासनाच्या एका बाकावर एक विद्यार्थी, प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग, हात धुण्यासाठी मुबलक पाणी अशा सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल अशी माहिती तडवी यांनी दिली. 
  • प्रत्येक विद्यार्थी शाळॆत जसजसा उपस्थित होईल तसे त्याला त्यांच्या वर्गशिक्षक, शाळा प्रशासनाकडून मास्क वाटपाची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान, शाळा सुरु होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र बंधनकारक असणार आहे.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रSchoolशाळाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका