रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:15 IST2025-02-28T17:15:04+5:302025-02-28T17:15:46+5:30
Railway Recruitment 2025: रेल्वे विभागात 32,438 पदांसाठी मेगाभरती सुरू आहे.

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
Railway Recruitment : सरकारीनोकरीची, खासकरुन रेल्वेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रेल्वे विभागात मोठी भरती निघाली आहे. आरआरबी ग्रुप D च्या 32438 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, उद्या(1 मार्च 2025) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज भरला नाही, त्यांनी RRB च्या अधिकृत वेबसाइट www.rrbapply.gov.in वर लवकरात लवकर अर्ज भरावा.
पात्रता
कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो.
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 36 वर्षे असावे.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 23 जानेवारी 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 मार्च 2025
फी भरण्याची अंतिम तारीख: 3 मार्च २०२५
अर्जात दुरुस्त्या करण्याची तारीख: 4 मार्च ते 13 मार्च 2025
RRB गट डी परीक्षेची तारीख: लवकरच प्रसिद्ध होईल.
पगार काय असेल?
रेल्वे गट डी भरती 2025 साठी निवडलेल्या उमेदवारांना रु. 18000/- वेतनश्रेणी मिळेल.
किती फी भरावी लागेल?
जनरल, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, दिव्यांग आणि EBC श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये भरावे लागतील. अर्जाचे शुल्क UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.
अर्ज कसा करायचा
अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी प्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइट www.rrbapply.gov.in वर जावे.
येथे होमपेज ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील.
जर तुम्ही पहिल्यांदाच RRB फॉर्म भरत असाल, तर Create An Account या लिंकवर जा, जर तुमच्याकडे आधीच RRB खाते असल्यास, दुसऱ्या लिंकवर जा.
नवीन नोंदणी लिंकवर जाताच तुमच्यासमोर नोंदणी विंडो उघडेल.
येथे विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
ईमेल आणि मोबाईल नंबरची पडताळणी केल्यानंतर तुमचा आधार पडताळला जाईल.
आधार कार्ड नसल्यास, RRB ने स्वतंत्र कागदपत्रे देखील निर्धारित केली आहेत.
ईमेल आणि पासवर्ड सत्यापित केल्यानंतर, तुमचे RRB खाते तयार केले जाईल.
वेबसाइटवर लॉग इन करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जाण्यासाठी पुढील वर क्लिक करा.
अर्जाचा फॉर्म 6 टप्प्यात पूर्ण केला जाईल, यात वैयक्तिक तपशील, इतर तपशील, शैक्षणिक पात्रता, प्रोफाइल दस्तऐवज अपलोड करा आणि शेवटी प्राधान्य निवडा.
फोटो आणि सही योग्य अपलोड करा.
अर्ज फी सबमिट करा.
फॉर्मची अंतिम प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.