अमेरिकेत जाऊन अभ्यास करण्याची योजना आखताय? कॉलेजदुनियाच्या निबंध शिष्यवृत्तीचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 03:29 PM2022-03-07T15:29:44+5:302022-03-07T16:26:14+5:30

अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च मोठा असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रायोजकात्वाची गरज भासू शकते

Planning to study in USA checkout collegedunias essay scholarship | अमेरिकेत जाऊन अभ्यास करण्याची योजना आखताय? कॉलेजदुनियाच्या निबंध शिष्यवृत्तीचा विचार करा

अमेरिकेत जाऊन अभ्यास करण्याची योजना आखताय? कॉलेजदुनियाच्या निबंध शिष्यवृत्तीचा विचार करा

Next

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अमेरिकेत शिकतात. चलन बदलाचा कमी असलेला दर आणि महागड्या जीवनशैलीमुळे अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आर्थिक स्थैर्य राखणं अवघड जातं. अमेरिकेत शिकण्यासाठी जवळपास 35 हजार ते 40 हजार अमेरिकन डॉलर (~26.36 ते 30.12 लाख रुपये) इतका खर्च येतो. इतक्या खर्चामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रायोजकात्वाची गरज भासू शकते. कॉलेजदुनिया 1000 डॉलर विद्यार्थी निबंध शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज 10 जानेवारी 2022 पासून स्वीकारले जात आहेत.

निबंध शिष्यवृत्ती हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी निधी उभारण्याचा स्रोत आहे. अमेरिकेतील SEVP नोंदणीकृत विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेल्या संस्थेला थेट पुरस्काराची रक्कम दिली जाते. इव्ही लीग विद्यापीठांच्या यादीत समावेश होणाऱ्या विद्यापीठात प्रवेश घेतल्यास शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य दिलं जातं.

अमेरिकेतील अग्रगण्य विद्यापीठं (Top Universities to Study in USA)

University NameFees in USDEquivalent Fees in INR
Harvard University$51,90039.1 lakhs

Princeton University

$78,00058.77 lakhs
Yale University$59,95045.17 lakhs
University of Pennsylvania$90,00067.81 lakhs
Dartmouth College$70,00052.74 lakhs
 
Columbia University$76,92057.96 lakhs
Brown University$75,00056.51 lakhs
Cornell University$80,00060,28 lakhs

पात्रतेचे निकष (Eligibility Criteria)
अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कॉलेजदुनिया 1000 डॉलर विद्यार्थी निबंध शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. त्यासाठीचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
● विद्यार्थ्यानं नोंदणीकृत अमेरिकन विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा.
● विद्यार्थी 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असावा.
● विद्यार्थ्यानं अर्जासोबत निबंध जोडावा. त्यात खालील मुद्दे असावेत
○ तुम्हाला अमेरिकेत अभ्यास का करायचा आहे?
○ तुम्हाला या शिष्यवृत्तीची गरज का आहे?
○ ही शिष्यवृत्ती तुम्हाला कशी मदत करेल?
○ तुम्ही इतर अर्जदारांपेक्षा चांगले कसे आहात?

अर्जाची प्रक्रिया (Application Process)
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरायचा आणि तो भरण्यामागचं कारण त्यात नमूद करायचं. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत.
● अर्ज केवळ ऑनलाईन उपलब्ध आहे.
● विद्यार्थ्यांनी अर्जात त्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, पार्श्वभूमीची माहिती आणि संपर्काचा तपशील नमूद करावा.
● शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची कारणं असलेला 200 ते 500 शब्दांचा निबंध
● लेखन इंग्रजीतच असावं.
● अर्ज केवळ एकदाच भरता येईल आणि तो एडिट करता येणार नाही.
● लिखाण योग्य शब्दांत असावं. त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास अपात्र ठरवण्यात येईल.

शिष्यवृत्ती बक्षिसाचा तपशील (Scholarship Award Details)
● अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
● विजेत्याला 1 हजार डॉलरचं (75,283 रुपये) बक्षीस देऊन गौरवण्यात येतं.
● 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत US Universities प्रवेश घेत असल्याचे पुरावे विद्यार्थ्यांना द्यावे लागतात.
● शिष्यवृत्तीच्या बक्षिसाचा वापर विद्यार्थ्यानं अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी करावा. प्रायोजकांच्या सहमतीशिवाय बक्षीस हस्तांतरित करू नये.
● शिष्यवृत्ती रोख रकमेच्या स्वरुपात दिली जाते. त्या बरोबरीची रोख रक्कम दिली जाणार नाही.
● प्राप्तिकर कायद्याच्या कलम 194B अनुसार, शिष्यवृत्तीच्या रकमेतून कराची रक्कम वजा केली जाईल.

शिष्यवृत्ती निवडीचे निकष (Scholarship Selection Criteria)
अमेरिकेतील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी बरीच स्पर्धा असते. अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणूनही तितकीच स्पर्धा करावी लागते. शिष्यवृत्तीच्या निवडीचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
● विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं
● शब्दमर्यादेत राहून लिखाणं पूर्ण करणं
● व्याकरण
● वाक्यरचना
● कलात्मक सादरीकरण
● प्रश्नांना योग्यपणे उत्तर देण्याची क्षमता
● लिखाणाचा दर्जा
● विजेता आवश्यक कागदपत्रं जमा करण्यात अपयशी ठरल्यास, तो अपात्र ठरतो आणि त्याखालोखाल सर्वाधिक गुण मिळवणाऱ्याला त्यानं आवश्यक कागदपत्रं जमा केल्यावर बक्षिसानं गौरवण्यात येतं
● प्रायोजकांनी केलेली निवड अंतिम असते आणि ती बंधनकारक असते.

कॉलेजदुनिया 1000 डॉलर विद्यार्थी निबंध शिष्यवृत्तीची अर्ज प्रक्रिया सोपी आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी निकष पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचं अमेरिकेत शिक्षण घेण्याचा अनुभव अधिक सुखकर होतो.

Web Title: Planning to study in USA checkout collegedunias essay scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.