शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

ऑनलाइन क्लाससाठी नव्हता फोन, तरीही परिस्थितीशी झगडत १०वीच्या परीक्षेत मिळवले ९८ टक्के 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 16:06 IST

Education News: एका अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याने सोईसुविधांचा अभाव असतानाही नेटाने अभ्यास करत १०वीच्या परीक्षेत तब्बल ९८.०६ टक्के गुण मिळवले आहेत. त्यासह त्याने संपूर्ण जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथील एका अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याने सोईसुविधांचा अभाव असतानाही नेटाने अभ्यास करत १०वीच्या परीक्षेत तब्बल ९८.०६ टक्के गुण मिळवले आहेत. त्यासह त्याने संपूर्ण जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. दहावीमध्ये ९८.०६ टक्के गुण मिळवणारा मनदीप सिंह हा गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे शाळेत जाऊ शकला नव्हता. तसेच ऑनलाइन क्लाससाठी त्याच्याकडे फोन किंवा संगणक नव्हता. मात्र संपूर्ण एकाग्रतेने केलेला अभ्यास आणि कुटुंबीय व पोलिसांनी केलेल्या मदतीच्या जोरावर त्याने केवळ चांगला अभ्यास केला नाही तर परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. (The phone was not for the online class, but still struggled with the situation and got 98 percent in the 10th exam)

मनदीप सिंह याने परीक्षेत अव्वल आल्यानंतर डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मनदीपचे वडील हे शेतकरी आहेत. मनदीपसुद्धा कधीकधी शेतात जाऊन काम करतो. तो म्हणाला की, मी अभ्यासाबरोबरच शेतात जाऊन काम करतो. तसेच घरकामामध्ये माझ्या आई-वडिलांची मदत करतो.  मनदीप सिंहवा त्याचा मोठ्या भावाकडून मदत मिळाली. त्याने जम्मू स्थित शेर ए काश्मीर कृषी विज्ञान आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालयामध्ये अभ्यास केला आहे. मात्र तो सुद्धा कोरोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे घरी परतला होता. आता NEET ची परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टरीचे शिक्षण घेण्याची इच्छा मनदीप याने व्यक्त केली आहे. 

मनदीप याने सांगितले की, सरकारने दुर्गम भागातील क्षेत्रात शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी खूप योजना आणल्या आहेत. गरीब विद्यार्थ्यांची सरकारने मदत केली पाहिजे. त्यांच्या स्वप्नांना साध्य करण्यामध्ये त्यांची मदत केली पाहिजे, असेही तो म्हणाला. दरम्यान, आपल्या मित्रांबाबत बोलताना त्याने सांगितले की, त्यांनी लॉकडाऊनबाबत त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत असल्याची तक्रार केली. मात्र मी समस्यांबाबत वारंवार तक्रार करण्याऐवजी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आणि कठोर मेहनत घेतली.   

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीJammu Kashmirजम्मू-काश्मीर